ETV Bharat / state

Eight Feet long Python : टेम्पोमध्ये सापडला आठ फुटांचा अजगर, पाहा पुढे काय झाले..

भाजीपाल्यासह टॉमेटोची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोमध्ये भलामोठा अजगर प्रवास ( Eight Feet long Python ) करत तो भाजी मार्केटमध्ये आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील भाजी मार्केट मध्ये घडली आहे

Eight Feet long Python
टेम्पोमध्ये भलामोठा अजगर
author img

By

Published : Nov 10, 2022, 2:14 PM IST

ठाणे : भाजीपाल्यासह टॉमेटोची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोमध्ये भलामोठा अजगर प्रवास ( Eight Feet long Python )करत तो भाजी मार्केटमध्ये आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील भाजी मार्केट मध्ये घडली आहे. मात्र या अजगराला पाहून भाजी मार्केटमध्ये एकच गोंधळ उडाला.

टेम्पोमध्ये सापडला आठ फुटांचा अजगर

टॉमेटोचे कॅरेट खाली करताना दिसला अजगर : नगर, पुणे, नाशिकच्या ग्रामीण भागातील शेतीतून दिवसागणिक जवळपास १०० ते १५० ट्रक , टेम्पोमधून भाजीपाला, कांदे, बटाटे , टॉमेटोची वाहतूक करून ते कल्याण डोंबिवली मधील विविध भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी आणले जाते. अश्याच एका ग्रामीण मधून टॉमेटोची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून एक अजगर थेट कल्याण पूर्वेतील भाजीपाला मार्केट प्रवास करून आला होता. मात्र ज्यावेळी टेम्पो मधून टॉमेटोचे कॅरेट खाली करताना एका कामगाराचे लक्ष या अजगराकडे गेले. आणि त्यानंतर मार्केटमध्ये असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता.

अजगरला निसर्गात मुक्त करून जीवदान : मार्केटमधील गोंधळ पाहून तातडीने प्रवीण जगताप ह्या भाजीपाला विक्रेत्याने सर्पमित्र स्वामी वराडकर व प्रथमेश डांगे यांना मोबाईलवर संर्पक करून टेम्पो मध्ये टॉमेटो घेऊन आलेल्या टेम्पोमध्ये अजगर असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच दोन्ही सर्पमित्र घटनास्थळी दाखल होऊन पाहाणी केली असता, नागरिकांच्या गोंधळामुळे अजगर टेम्पोच्या चेसीमध्ये दडून बसला होता. त्यानंतर या अजगराला सर्पमित्रांनी शिताफीने पकडून पिशिवत बंद केल्याने नागरिकांसह टेम्पो चालकाने सुटेकचा निश्वास घेतला. हा अजगर सहा फुटी लांबीचा असून कल्याणचे वन विभागाचे आरएफओ चन्ने व वनपाल राजेंद्र शिंदे यांच्या देखरेखीत त्या अजगराला निसर्गात मुक्त करून जीवदान दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.