ETV Bharat / state

ठाण्यात आठ बोगस डॉक्टर अटकेत, गुन्हे शाखेची कारावई - ठाणे

कळवा, मुंब्रा, डायघर आणि दिवा परिसरातून ८ बोगस डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बोगस डॉक्टर व पोलीस पथक
बोगस डॉक्टर व पोलीस पथक
author img

By

Published : Feb 8, 2020, 12:59 PM IST

ठाणे - महापालिका हद्दीमध्ये बोगस डॉक्टरांविरुद्ध अनेक तक्रारी येत असतानाच कळवा परिसरातही बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार, मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने कळव्यातील 8 बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

ठाण्यात आठ बोगस डॉक्टर अटकेत

आलोक सुभाषचंद्र सिंह (वय 39 वर्षे), रामजीत कंचन गौतम (वय 47 वर्षे), गोपाल बाबू विश्वास (वय 47 वर्षे), रामतेज मोहन प्रसाद (वय 50 वर्षे), सुभाषचंद्र राजाराम यादव (वय 47 वर्षे), जयप्रकाश लालजी विश्वकर्मा (वय 40 वर्षे), दीपक बाबू विश्वास (वय 48 वर्षे), सत्यनारायण लालमन बिंद (वय 42 वर्षे), असे अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत.

हेही वाचा - 'व्हॅलेंनटाईन डे'निमित्त मावळच्या गुलाबाची मागणी वाढली, १० दिवसात ८० लाखांचे उत्पन्न

कोणतीही वैद्यकीय पदवी तसेच परवाने नसताना हे बोगस डॉक्टर कळवा, मुंब्रा, डायघर आणि दिवा परिसरात बेकायदेशीररीत्या दवाखाना थाटून रुग्णाच्या जिवाशी खेळत होते. या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशा तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी याची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. या संदर्भात ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, मुंबई या संघटनेशी पत्रव्यवहार करत बोगस डॉक्टरांवर कारवाई प्रकरणी मदत करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

हेही वाचा - शिरूरची झिरो एनर्जी शाळा म्हणजे चमत्कार, छत्तीसगडचे शिक्षकही झाले आवाक

गुरुवारी (दि. 6 फेब्रुवारी) महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन संघटनेचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता व त्यांचे पथक तसेच, मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने कळव्यातील भास्करनगर आणि वाघोबानगर येथील विविध 8 क्लिनिकवर छापा टाकला. यावेळी 8 बोगस डॉक्टर कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांना इंजेक्शन, सलाईन व इतर औषधोपचार देताना आढळून आले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - पुण्यातील मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Intro:ठाण्यात आठ बोगस डॉक्टरांवर कारवाईBody:

ठाणे महापालिका हद्दीमध्ये बोगस डॉक्टरांविरुद्ध अनेक तक्रारी येत असतानाच कळवा परिसरातही बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे प्राप्त झाली होती.त्यानुसार, मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने कळव्यातील 8 बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.आलोक सुभाषचंद्र सिंह (39), रामजीत कंचन गौतम (47), गोपाल बाबू विश्वास (47), रामतेज मोहन प्रसाद (50), सुभाषचंद्र राजाराम यादव (47), जयप्रकाश लालजी विश्वकर्मा (40), दीपक बाबू विश्वास (48), सत्यनारायण लालमन बिंद (42) असे अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत.
कोणतीही वैद्यकीय पदवी तसेच परवाने नसताना हे बोगस डॉक्टर कळवा, मुंब्रा, डायघर आणि दिवा परिसरात बेकायदेशीररीत्या दवाखाना थाटून रुग्णाच्या जीवाशी खेळत होते. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी.अशा तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गंभीर दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले होते.यासंदर्भांत ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, मुंबई या संघटनेशी पत्रव्यवहार करून बोगस डॉक्टरांवर कारवाई प्रकरणी मदत करण्यात यावी अशी मागणी केली होती. गुरुवारी महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन संघटनेचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता व त्यांचे पथक तसेच, मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने कळव्यातील भास्करनगर आणि वाघोबानगर येथील विविध 8 क्लीनिकवर छापा टाकला. यावेळी 8 बोगस डॉक्टर कुठलीही वैद्यकीय पदवी नसतांना रुग्णांना इंजेक्शन, सलाईन व इतर औषधोपचार देतांना आढळून आले.याप्रकरणी,कळवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.