ठाणे - शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ठाण्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भारतीय जय हिंद पार्टीने हा चक्काजाम केला असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी कार्यकर्त्यांसह हा महामार्ग रोखला होता. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
पोलिसांनी ठाण्यात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. भारतीय जय हिंद पक्षाने तीन हात नाका भागात मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यांवर झोपुन आंदोलन केले. नौपाडा ठाणे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
![Eastern Express Highway blocked by bharatiya Jai Hind Party in Thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-thn-01-thaneprotest-7204282mp4_08122020090922_0812f_1607398762_611.jpg)
![Eastern Express Highway blocked by bharatiya Jai Hind Party in Thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-thn-01-thaneprotest-7204282mp4_08122020090922_0812f_1607398762_1054.jpg)
![Eastern Express Highway blocked by bharatiya Jai Hind Party in Thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-thn-01-thaneprotest-7204282mp4_08122020090922_0812f_1607398762_113.jpg)
हेही वाचा - चालू सामन्यादरम्यान विराटने काढली धोनीची आठवण