ठाणे : तुर्की आणि सीरियामध्ये भूकंप आला. हा विनाशकारी भूकंप होता. हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे. तुर्कीमधील १० राज्यात भूकंपाची तीव्रता अधिक होती. १० हजार इमारती जमीनदोस्त झाल्याचे तर १ लाख इमारतींना तडा गेल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे हे विकसित शहर आहे. यापूर्वीही गुजरातमध्ये कच्छ जवळील भरूच येथे भूकंप आला. तास भूकंप कुठेही येऊ शकतो. त्यामुळे भूकंप टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हिताचे ठरणार आहे.
भूकंपाविरोधी बांधकाम : या भूकंपाची तीव्रता कमी करता येऊ शकते. तर दुसरीकडे होणारी जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यासाठी थंय सारख्या शहराने दूरदृष्टी ठेवीत बांधकाम क्षेत्रात इमारती उभारताना त्या आधुनिक तंत्रज्ञान वापरुन भूकंपाविरोधी बांधकाम करावे. खर्च जरी वाढला, तरीही भूकंपाची शक्यता असलेल्या क्षेत्रात बांधकामात भूकंप विरोधक प्रणालीचा वापर करणे महत्वाचे आहे. यामुळे जीवितहानी सोबतच इमारती जमीनदोस्त होण्याच्या आकड्याला ब्रेक लावता येऊ शकतो.
बांधकाम करताना शासनाच्या गाईड लाईन : ठाणे हे विकासाच्या वाटेवरील एक अग्रगण्य शहर आहे. या शहरात अनेक इमारती या २० ते २५ माळ्याच्या आहेत. तर काही इमारती या ५२ माळे आणि ७२ माळ्याच्या होण्याच्या तयारीत आहेत. भूकंपाच्या झटक्याने अशा बहुमजली इमारतीचे नुकसान आणि जीवितहानी होते. मात्र त्याला आळा घालण्यासाठी अशा बहुमजली इमारतींचे बांधकाम करताना शासनाच्या गाईड लाईन यांच्याकडे लक्ष देऊन अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.
भूकंप विरोधक तंत्रज्ञान : इमारतीच्या डिझाईनपासून ते त्याच्या पायाभरणीच्या लांबी रुंदी आणि खोलीची दक्षता घेणे गरजेचे आहे. भूकंपविरोधक प्रणालीचा वापर तंतोतत करून उइमारतींचे बांधकाम होणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात भूकंप जरी आला, तरीही जीवितहानी आणि नुकसान कमी होईल अशी प्रतिक्रिया वास्तुविशारद सचिन पोतदार यांनी व्यक्त केली. उंच इमारती बनविताना नियुक्त इंजिनियर यांना भूकंप विरोधक तंत्रज्ञान वापरून बनविणे हा सोईस्कर मार्ग आहे.
जपानमध्ये अद्यावत टेक्निक प्रणाली : सध्या जपानमध्ये अद्यावत टेक्नॉलॉजी आहे. कारण जपानमध्ये भूकंप विरोधक प्रणालीचा वापर करून पाण्यावर तरंगती इमारत बनविण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या देशात इमारत बनविताना त्याच्या डिझाई पासून इमारतीच्या बांधकामाचे मोजमाप होणे गरजेचे आहे. ठाण्यात होणाऱ्या उंच इमारती करताना इमारतीचा पाया किती खोल असावा, इमारतीचे डिझाईन कुठल्या प्रकारची असावी? याचे तंत्र हे शासनाच्या भूकंपविरोधक गाईड लाईनमध्ये आहे. त्याचे तंतोतंत पालन केल्याने भूकंपातही नुकसान आणि जीवितहानीच्या संख्येला आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
विकसित शहरांनी घ्यावी काळजी : ठाणे हे विकसित शहर आहे. या शहरात मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारती आहेत. नव्या इमारती बनत आहेत. या इमारती बनवताना दूरदृष्टी ठेवून भूकंपविरोधक प्रणालीचा वापर केला आहे कि नाही. भूकंप सांगून येत नाही. त्यामुळे इमारत बनविताना सुरुवातीपासून त्याची तयारी करावी लागते. इमारतीच्या डिझाईनमध्ये त्याचा समावेश असला पाहिजे, यासाठी शासनाच्या गाईड लाईन आहेत. त्याची अंमलबजावणी ही अत्यंत महत्वाची आहे.