ETV Bharat / state

वाशी पामबीच मार्गावरील ई-टॉयलेट चोरीला; प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा प्रकार समोर

जवळपास सर्वच ई-टॉयलेट सध्या वापराविना भंगार अवस्थेत आहे. या टॉयलेटच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ई-टॉयलेट योजनेचा अवघ्या चार वर्षात फज्जा उडल्याचे दिसत असून या प्रकाराने मनपा प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

e toilet
इ-टॉयलेट
author img

By

Published : Nov 21, 2020, 7:52 PM IST

नवी मुंबई (ठाणे) - स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने मोठ्या थाटत शहरात 60 टॉयलेट आणि 20 ई-टॉयलेट उभारली. मात्र, यातील वाशी पामबीच मार्गावरील गोकुळ डेअरी जवळील ई-टॉयलेट चोरट्यांनी उखडून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनपा अधिकाऱ्यांनी चोरीची तक्रार नोंदवली आहे.

तक्रारदार याबाबत प्रतिक्रिया देताना.

प्रशासनाचा गलथान कारभार -

जवळपास सर्वच ई-टॉयलेट सध्या वापराविना भंगार अवस्थेत आहे. या टॉयलेटच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ई-टॉयलेट योजनेचा अवघ्या चार वर्षात फज्जा उडल्याचे दिसत असून या प्रकाराने मनपा प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नवी मुंबई शहरात नैसर्गिक विधीकरिता नागरिकांची गौरसोय होऊ नये, म्हणून शहरात मनपाच्या वतीने रस्त्याच्या कडेला आणि वर्दळीच्या ठिकाणी २०१७ला २६ ठिकाणी ई-टॉयलेट कार्यान्वित केले आहे. सुरुवातीला भांडवली खर्च वसूल करण्यासाठी सुटे नाणे टाकून वापरण्याची सुविधा या टॉयलेटमधे ठेवण्यात आली होती. मात्र, चोरट्यांनी सुटी नाणी चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडू लागल्याने स्वयंचलित पद्धतीने वापराची सुविधा देण्यात आली. तर या अनुभवातूनही प्रशासन सुधारले नसल्याचा प्रत्यय आला आहे.

आता पामबीच मार्गावर गोकुळ डेअरीसमोर असलेले ई-टॉयलेटच चक्क चोरून नेल्याचा प्रकार घडल्याचे समोर आला आहे. याबाबत स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. मात्र, चोरीच्या या घटनेवर प्रशासनाने मौन बाळगून झाला प्रकार विसरले आहेत.

हेही वाचा - वायरी जाळून भंगार काढण्याचा प्रयत्न; दुकानदाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

मनसेच्या माध्यमातून विचारला जाब

याप्रकरणी मनसेचे बाळासाहेब शिंदे, विनोद पार्टे आणि निलेश बाणखिले यांनी उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांनी निवेदन दिले. तसेच या प्रकाराचा जाब विचारला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली नसल्याने तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर मनसेने चोरीला गेलेल्या टॉयलेट बाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

आयुक्तांच्या कारवाईकडे लक्ष?

यावर्षी मनपा प्रशासन स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकावर येण्याची धडपड करताना दिसते. मात्र, यासाठी खर्च केलेल्या कोट्यावधी रुपयांचा कसा चुराडा होत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव ई-टॉयलेटच्या निमित्ताने समोर आला आहे. अवघ्या चार वर्षातच ई-टॉयलेटची अवस्था भंगार झाली. देखभाल दुरुस्तीसाठी नेमलेले कंत्राटदार अचानक गायब झाल्याने आलिशान ई-टॉयलेटची अवस्था बिकट झाली आहे. याबाबत उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्याकडे विचारणा केली असता चोरीला गेलेल्या ई-टॉयलेटची तक्रार नोंदवली आहे, असे ते म्हणाले. मात्र, त्यांनी बंद असलेल्या टॉयलेटबाबत मौन बाळगणे पसंत केले. तर आयुक्त अभिजीत बांगर आता याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनपा हद्दीत पटकावले पुरस्कार -

महापालिका हद्दीत ई-टॉयलेट, आणि नॉर्मल टॉयलेट या विविध उपक्रमांसाठी 'स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट' असे प्रथम क्रमांकाचे दोन राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबई मनपाने पटकावले आहेत. शहरात २०१४ ते २०१७ या कालावधीत ९३ सार्वजनिक शौचालये तसेच आधुनिक पद्धतीची स्मार्ट २० ई-टॉयलेट आणि महिलांसाठी स्पेशल ६ स्मार्ट टॉयलेट उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी तीन कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

रिलायन्ससारख्या मोठ्या कंपन्यांच्या मदतीने शहरात सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर आणि पामबीच मार्गावर २५ ई-शौचालये आणि फक्त महिलांसाठी सहा ‘शौचालये’ उभारण्यात आली. मात्र, ही सर्व शौचालये पाणी आणि वीज नसल्याने बंद पडली आहेत. हे एक शौचालय १४ लाख रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. मात्र, या ई-टॉयलेटवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्या खर्चाच्या तुलनेत निगा राखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

चोरीची पोलीस ठाण्यात नोंद -

पामबीच मार्गावरील चोरीला गेलेल्या टॉयलेटची पोलीस दप्तरी अवघ्या ३५ हजाराची चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मनपाच्या वतीने तक्रार केली त्यावेळी या ठिकाणी शेड होते. मात्र, आता हे शेडदेखील गायब झाले आहे. तरीदेखील प्रशासन सध्या चोरीचा प्रकार म्हणून डोळेझाक करून याकडे दुर्लक्ष करत आहे. स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेल्या या टॉयलेटची किंमत पोलिसांकडे अवघी ३५ हजार रुपये दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.