ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या ( Thane Police Commissionerate ) हद्दीत विविध पोलीस ठाण्यात अपहरण सारखे गुन्हे दाखल होण्याची संख्या मोठी ( Kidnapping Crimes in Thane Police Commissionerate ) आहे. पोलिसांना अपहरण झालेल्या मुली सापडत नाहीत. त्यामुळे सदरचे गुन्हे सहा ते सात वर्ष कालावधीनंतर अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध विभागाकडे ( Immoral Human Trafficking Prevention Division ) तपासासाठी दाखल करतात. तर या,च पथकाच्या अखत्यारीत पिटा सारख्या गुन्ह्यांवर धडक कारवाई करण्यात येते.
अपहरणाच्या ८४६ गुन्ह्यापैकीं ७३६ गुन्हे उघड- वर्षभरात ठाणे आयुक्तालयात दाखल झालेल्या अपहरणाच्या ८४६ गुन्ह्यापैकीं ७३६ गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत. यामध्ये २१५ मुलांचा समावेश आहे. तर ६११ मुलांचा समावेश आहे. प्रामुख्याने सदरचे गुन्हे हे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे आहेत. त्या गुन्ह्यांचा तपास न लागल्यानंतर सदरचे गुन्हे हे अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध शाखेकडे पाठविण्यात येतात. त्यानंतर वर्षभराचा काळ लोटल्यानंतर पोलीस पथक तपासाला सुरुवात करते. तर दुसरीकडे घरातून पळून गेलेली मुले, मुली या मात्र आपला मोबाईल नंबर बदलतात. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक विभागाच्या पथकाला शोध घेण्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. दरम्यान उघड गुन्ह्यात अनेक मुली, मुली या विवाहित झाल्यानंतर पथकाने शोधून काढल्या असल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती सत्यजित चव्हाण यांनी दिली.
प्रेम प्रकरण ठरतात घातक - अनैतिक मानवी तस्करी प्रतयिबंध विभागाकडे आलेल्या गुन्ह्याची तपासणी करताना प्रकर्षाने आढळते. ही प्रकरणे अपहरण नसून प्रेमप्रकरणे असलयाचे समोर येते. मुली-मुले पळून जातात, कुठेतरी संसार साधतात. त्यानंतर ते काही काळानंतर आपल्या आई-बाबा यांच्याशी संपर्क करतात त्यानंतर पोलीस पथकाच्या तपासाला पुन्हा एकदा वेग येतो. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचतात तेव्हा दोन्ही पाळलेली मुलगी, मुलगा हे विवाहित आढळतात. वास्तविक अनेक कारणास्तव मुले घरातून बाहेर पडतात. ती सापडली नाही कि, स्थानिक पोलीस ठाण्यात अपहरण सारखे गुन्हे दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पालकांनी आपल्या पाल्याच्या वागणुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच्याशी मैत्री करून त्याला मित्राप्रमाणे ट्रीटमेंट देणे गरजेचे आहे. त्याच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. मुले एकटी पडलेली असतात त्यामुळे ते मोबाईलमध्ये व्यस्त होतात. मोबाईलमधील व्हाट्सअप,फेसबुक सारख्या गोष्टीमुळे मैत्री वाढते आणि प्रेमप्रकरणे घडतात. तेव्हा पालकांनी मुली-मुले यांच्याकडे जातीने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. दुर्लक्ष झाल्यास अशा पद्धतीने परिणाम समोर येतात. आक्टोबर मध्ये २१ केसेस आल्या होत्या. त्यापैकी १५ केसेस उघड करण्यात आलेल्या आहेत. तर ४ गुन्ह्यांचा समांतर तपास सुरु आहे.
२०२१-२०२२ मध्ये ७५ बळितांची सुटका - अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध विभागाच्या पथकाने पिटा अंतर्गत धडक कारवाई केलेली आहे. २०२१ वर्षात २९ केसेस मध्ये पथकाने ५६ आरोपीना अटक केली. तर ७१ बळितांची सुटका करण्याची धडक कारवाई केली. पिटा अंतर्गत महिलांना मुलींना, पैशाचे अमिष दाखवून वेश्यावृत्तीत ढकलणाऱ्या दलालांची धरपकड करीत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो. तर फसलेल्या मुलींनाची सुटका करण्यात येते. सन २०२२ मध्ये अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध विभाग पोलीस पथकाने केलेल्या धडक कारवाईत घरातून पळून आलेल्या मुलींना वाममार्गाला लावून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलालनवर पिटा अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येते. या वर्षात ३ गुन्हे दाखल करून ४ बळितांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.
लसीकरणाच्या नोंदीची पोलीस पथक घेतात मदत - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून अपहरण झालेल्या मुलींच्या प्रकरणात बहुतांश प्रेमप्रकरण आढळतात. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले गुन्हे हे अनैतिक मानवी तस्करी विभागाकडे किमान ६ किंवा वर्षाने येतात.अलीकडेच १५ गुन्ह्याची उकल ही लसीकरणाच्या नोंदीच्या मदतीने उघड झाल्याची माहिती अनैतिक मानवी तस्करी विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सत्यजित चव्हाण यांनी दिली. घरातून बेपत्ता झालेलय मुली या त्यावेळी अल्पवयीन असल्या तरीही गुन्हा दाखल होऊन वर्षभराने किंवा पोलीस पथक त्यांच्यापर्यंत पोहचेपर्यंत प्रौढ झालेल्या असतात. त्यामुळे त्या लग्न करून संसार थाटतात. या मुली घरातून निघाल्यानंतर मोबाईल कार्ड बदलतात. त्यामुळे स्थानिक पोलिसांना मुली ट्रेस होत नाही. सीडीआर, एसीआर सारख्या प्रणाली फोल ठरतात. आता पोलीस पथक हे महामारीनंतर या मुलींनी कोरोना काळात लसीकरण केल्यास त्यांची नोंद आणि मोबाईल हा घेतला जातो. अन पोलीस पथकानेही हा नवीन नंबर मिळतो अशा प्रकारे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी लसीकरण नोंदीचा चांगला वापर होतो. या नव्या युक्तीने तब्बल १५ गुन्हे अलीकडेच उघडकीस आल्याची माहिती उपलब्ध आहे.
पालकांनी लक्ष देणे अति महत्त्वाचे - घरातून पळून जाणाऱ्या मुलीवर पालकांनी लक्ष न दिल्याने त्या घरातून बाहेर पडतात. वयोगटानुसार या मुलींवर पालकांनी लक्ष देणे, त्यांच्या मोबाईल वापरावर, वेळेवर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी जवळीक आणि मैत्रीपूर्ण वातावरण तयार करणे अशी उपाययोजना केल्यास मुली निघून जाण्याचे प्रकाराला आळा बसेल.