ठाणे - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातल्या तळीरामांचे घसे कोरडे पडले आहे. वाईन शॉप अद्याप बंद असले तरी शॉपच्या बाहेर काही मद्यपी घुटमळत असल्याचे दिसत आहे. ठाण्यातील बंद असलेल्या वाईन शॉपवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्यसरकारच्या वाइन शॉप उघडण्याच्या निर्णयामुळे राज्यभर सर्व वाईन शॉप च्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी सोशल डिस्टन्सचा बोजवाला उडालेला आहे. पोलीस गर्दीवर गर्दी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
जिल्हा प्रशासन जोपर्यंत आदेश देत नाही, तोपर्यंत दुकान उघडली जाणार नाहीत असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना केले जात आहे. मात्र, पोलिसांच्या आवाहनानंतर सुद्धा गर्दी कमी झालेली नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास गर्दी करणाऱ्यांना लाठीचा प्रसाद देण्यात येईल असं पोलिसांनी बजावले आहे.
मागील अनेक दिवसांपासून मद्यविक्री बंद असल्यामुळे नागरिक मद्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पिशव्या आणि बॉक्स घेऊन आलेले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या आदेश नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झालेला आहे.