ETV Bharat / state

भिवंडीत चतु:सूत्री ठरली फायद्याची.. रुग्ण दुपटीचा कालावधी 8 वरुन 24 दिवसांवर

author img

By

Published : Jul 18, 2020, 5:02 PM IST

चतु:सूत्री कार्यक्रमात सर्वप्रथम रुग्णालय व्यवस्थापन या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाने जी खासगी रुग्णालये कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केली ती सुरू करणे, जे रुग्ण आढळून येत आहेत त्यांच्या निकट संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे अलगिकरण करुन तत्काळ तपासणीकरण्यात आली, चाचणी तपासणीचा वेग वाढवून घरोघरी जाऊन सर्वेक्षणावर भर दिला.

duration-of-corona-patient-doubling-is-from-eight-to-twenty-four-days-in-thane
रुग्ण दुपटीचा कालावधी आठवरुन चोवीस दिवसांवर

ठाणे- मालेगाव येथे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यास यशस्वी ठरलेले डॉ.पंकज आशिया यांच्या हाती ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे २० जून रोजी सोपवण्यात आली आहेत. त्यांनी पालिका आयुक्त पदाचा पदभार हाती घेताच शहरातील आरोग्य सुविधांचा आढावा घेत चतु:सूत्री कार्यक्रम आखला आहे. पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून तत्कालीन आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्या अपयशी कारकिर्दीचा शेवट शासनाने त्यांची अचानक उचलबांगडी केली होती.

रुग्ण दुपटीचा कालावधी 8 वरुन 24 दिवसांवर

चतु:सूत्री कार्यक्रमात सर्वप्रथम रुग्णालय व्यवस्थापन या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाने जी खाजगी रुग्णालये कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केली ती सुरू करणे, जे रुग्ण आढळून येत आहेत त्यांच्या निकट संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे अलगिकरण करुन तत्काळ तपासणीकरण्यात आली, चाचणी तपासणीचा वेग वाढवून घरोघरी जाऊन सर्वेक्षणावर भर दिला. जे संशयित रुग्ण उपचार करुन घेत नव्हते अशांचा शोध घेण्यात आला, कोरोना आजाराबाबतचे समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक सेवाभावी संस्थांची मदत, शहरात प्रतिबंधित क्षेत्रांची कडक अंमलबजावणी या चतु:सूत्री कार्यक्रमातून १ जुलैनंतर या उपाययोजनांचा परिणाम दिसून येत आहे. यातून रुग्ण वाढ मंदावली आहे. तर वेळीच उपचार मिळू लागल्याने शहरातील मृत्यू दर घटला आहे. १५ जुलैपर्यंत ९६३ रुग्ण वाढ झाली तर ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. जूनमध्ये रुग्ण दुप्पट वाढीचा वेग आठ दिवसांचा होता. तो आज २४ दिवसांवर आला आहे. त्यामुळे ६.३ टक्के असलेला मृत्यू दर ४.१ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.

यंत्रमाग उद्योगनगरीमुळे दाटीवाटीने वास्तव्य असणाऱ्या भिवंडी शहरात महाराष्ट्रात खास करुन मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण येथे झपाट्याने कोरोना संसर्ग वाढत असताना, शहरात पहिला रुग्ण १२ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर मे अखेरपर्यंत रुग्ण वाढ अत्यंत संथगतीने सुरू होऊन ११९ रुग्णांना लागण झाली तर ६ जणांचा मृत्यू झाला. यापैकी बहुसंख्य रुग्ण इतर शहरातील कोरोना संसर्ग परिसरातून अथवा हॉस्पिटलमधून लागण होऊन आले होते. मात्र त्यानंतर अनलॉक सुरू झालेल्या जून महिन्यात १,८२२ रुग्णांना लागण होऊन १०३ जणांचा मृत्यू झाला.

शहरातील रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात महानगरपालिका प्रशासन कुचकामी ठरत असल्याची ओरड लोकप्रतिनिधी व नागरीकांमधून वाढत होती. त्यामुळे पालिका प्रशासन फक्त कागदावरील आराखडे बनविण्यात मग्न राहिले. त्यामुळे शहरातील रुग्णांना ऑक्सिजनचा वेळीच पुरवठा न होणे, रुग्णवाहिका न मिळणे, रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक, रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन न घेणे अशा विविध समस्या उभ्या राहिल्याने शहरातील चाचणी न झालेल्या परंतु, या काळात मृत्यु झालेल्यांचे प्रमाण सुध्दा वाढले. शहरातील कब्रस्तानात दररोज बारा ते पंधरा मृतदेह दफन होत असतानाच एकमात्र शासकीय रुग्णालयावर भिस्त असल्याने स्वयंसेवी संस्थांनी ऑक्सिजन सेंटर उभारुन रुग्णांना उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

या काळात शहरात तब्बल २५ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने रुग्णवाहिका न मिळाल्याने होणारी समस्या थांबली आहे. तर सुरुवातीला ऑक्सिजन नसल्याने रुग्ण दगावत असल्याचे बोलले जात होते. मात्र शहरात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रुग्णांना ऑक्सिजन देण्याची सुविधा ९ जुलै रोजी खुदाबक्ष सभागृह या ठिकाणी सुरू केली. येथे १३६ ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध झाले आहेत. मात्र या ठिकाणी अवघे ३० रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. शहरातील कोरोना नियंत्रणास प्रामुख्याने कारणीभूत ठरले ते मोहल्ला क्लिनिक येथे उपलब्ध झालेल्या उपचारांमुळे. कोरोनाच्या भीतीने शहरातील असंख्य डॉक्टर्स मंडळींनी रुग्णालय, दवाखाने बंद करुन घरी बसल्याने नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसत असताना अथवा इतर आजारावर उपचार मिळू शकले नाहीत. हे सत्य कोणी नाकारणार नाही.

आज शहरात तब्बल २८ ठिकाणी स्वयंसेवी संस्थानी सुरू केलेल्या मोहल्ला क्लिनिकमधून परिसरातील नागरिकांवर उपचारास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कमी लक्षणे असलेले रुग्ण तत्काळ बरे होऊ लागले आहेत. आज आरोग्य सेवा सक्षम करण्यात आयुक्त डॉ. पंकज आशिया यशस्वी ठरले आहेत. शहरातील नागरिकांसाठी सुमारे १५९ बेड असलेले चार हॉस्पिटल उपलब्ध झाले आहेत. त्याव्यतिरिक्त ११ खाजगी रुग्णालयातील डेडीकेटेट कोविड हेल्थ सेंटरमधून १५७ बेड तर टाटा आमंत्रणसह रईस हायस्कुल, ओसवाल हॉल येथील कोविड केअर सेंटर मधून १,०८८ बेड उपलब्ध आहेत. शहरातील नागरिकांना गरज पडल्यास मुंबई, ठाणे येथील शासकीय रुग्णालयात देखील काही बेड राखीव आहेत. त्यामुळे २ हजार बेड सध्या नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.

सध्या तीन ठिकाणी अँटीजेन चाचणी सुविधा उपलब्ध करण्यात आली असून मागील दहा दिवसात १,१७३ रुग्णांची तपासणी केली आहे. त्यापैकी २३९ पॉझिटिव्ह तर ९३४ निगेटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे नागरिक देखील तपासणी करुन घेण्यास स्वतः हून पुढे येत असल्याने परिस्थितीत समाधानकारक सुधारणा होत असल्याची प्रतिक्रिया आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.