ETV Bharat / state

खाडीत कचऱ्याच्या लाटा; डेब्रिज टाकत खाडी बुजवण्याचं षडयंत्र उघड; जितेंद्र आव्हाड आक्रमक - जितेंद्र आव्हाड

Dumping Debris In Thane Creek : ठाण्याच्या खाडीत कचरा टाकल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ठाणे खाडीत कचरा टाकल्याचं उघडं झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत.

Dumping Debris In Thane Creek
खाडीत टाकण्यात आलेला कचरा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 10:15 AM IST

Updated : Dec 5, 2023, 12:16 PM IST

ठाणे Dumping Debris In Thane Creek : खाडीच्या किनारी असलेल्या खारेगाव टोल नाक्याजवळ सध्या मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात येत असल्यानं किनाऱ्यावर कचऱ्याच्या लाटा धडकताना दिसत आहेत. हे खासगी कंत्राटदारांचं काम नसून चक्क ठाणे महापालिका स्वतःचे नियम धाब्यावर बसवून हजारो डंपर कचरा इथं ओतत असल्यानं सामान्य नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

पर्यावरणाचे धडे देणारी महापालिका जर अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळू लागल्यानं पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इथं टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याबरोबर ठाणे शहर आणि अन्य भागातून मोठ्या प्रमाणात डेब्रिज आणून खाडी किनारी टाकलं जात आहे. या सगळ्या प्रकारामुळं खडकी नारी असलेल्या खारफुटीला प्रचंड धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं कचऱ्याचं डम्पिंग त्वरित थांबवावं, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

शहरात दररोज 90 हजार मेट्रिक टन कचरा : मुंबईचे जुळे शहर म्हणून ठाण्याची ओळख असून ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सध्या ठाण्याची लोकसंख्या 25 लाखांहून पुढे गेली असून या शहरात दररोज अंदाजे 90 हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. ठाणे महानगरपालिकेचं स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नसल्यानं गेली 20 वर्षे कचरा कुठं टाकायचा असा यक्ष प्रश्न महापालिकेसमोर उपस्थित राहीला आहे. दिवा येथील खासगी जमिनीवर क्षमता संपल्यावर देखील गेली अनेक वर्ष महापालिकेतर्फे कचरा टाकण्यात येत होता. कचऱ्याला दररोज लागणाऱ्या आगीमुळे दूर आणि दुर्गंधीनं त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलनं छेडली. त्यामुळे शहरात निर्माण होणारा कचरा भंडारी इथं टाकण्यास महापालिकेनं सुरुवात केली. इथल्या नागरिकांनी देखील कचऱ्याविरोधात आंदोलन छेडल्यावर आता डायघर इथं कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प नुकताच सुरू झाला आहे.

तर गाड्या पेटवल्या जातील : मुंबई नाशिक महामार्ग जवळच्या खाडीकिनारी महापालिका गुपचूप कचरा टाकत असल्याचं वृत्त कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सदर ठिकाणी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. दुसरं डम्पिंग तयार करुन खाडी किनारा बुजवण्याचा कट केलात तर याद राखा, असा सज्जड दमच जितेंद्र आव्हाड यांनी पालिका प्रशासनाला दिला. यापुढं अशाप्रकारे कचरा फेकण्याचा प्रयत्न केल्यास गाड्याच पेटवून देऊ असा, धमकीवजा इशारादेखील आव्हाड यांनी दिला.

खाडीतील जैवविविधतेला निर्माण झाला धोका : डायघर इथला प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरु न झाल्यानं, कचरा फेकण्यासाठी महापालिका इतर ठिकाणं देखील शोधत आहे. ठाण्यातील सीपी टँक परिसरात देखील कचरा टाकण्यात येत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत. आता तर चक्क मुंबई नाशिक महामार्गालगत खारेगाव टोलनाक्या जवळच खाडीत कचरा फेकणं सुरू झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारे दररोज शेकडो डंपर खाडीत कचरा आणून टाकत आहेत. त्यासोबतच बांधकामाच्या ठिकाणावर रॅबिट आणि इतर साहित्य देखील फेकलं जात असल्यानं खाडीतील जैववैविधतेला धोका निर्माण झाला आहे. ठाणे महानगरपालिकेनं कचरा टाकण्याची प्रक्रिया त्वरित थांबवली नाही तर खाडी किनाऱ्याची अवस्था अत्यंत वाईट होईल, अशी भीती पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

  1. खाडी संवर्धनासाठी ठाणेकर सरसावले
  2. ठाणे खाडी पुलाच्या कामाला आठवड्याभरात सुरूवात; एल अँड टीला कामाची परवानगी
  3. ठाण्यात खाडी किनारा विकास प्रकल्पाला गती

Last Updated : Dec 5, 2023, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.