ठाणे : मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, या रस्त्याच्या भरणीसाठी लागणारी माती चोरून आणून त्याचा महसूल (रॉयल्टी) शासनाकडे जमा केला जात नाही. याविरोधात नागरिकांनी तहसीलदारांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनुसार शनिवारी वडपे बायपास येथे धडक कारवाई करून मातीने भरलेले 2 डंपर जप्त करण्यात आले.
भिवंडी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी हजारो ब्रास माती वापरली जात आहे. मात्र, त्यासाठी लागणारी गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यास रस्ता ठेकेदार टाळाटाळ करून शासनाचा महसूल बुडवत आहे. याबाबत तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांनी निवासी नायब तहसीलदार महेश चौधरी, मंडळ अधिकारी दत्तात्रेय बांबळे, किरण केदार, तलाठी निलेश कांबेरे, विकास खरात, डी.के.शिंदे आदींच्या महसूल पथकासह तात्काळ कारवाई केली. त्यांनी मातीने भरलेले तीन डंपर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले आहेत. या धडक कारवाईने गौण खनिज रॉयल्टीची चोरी करणाऱ्या ठेकेदारांमध्ये एकच खळबळ माजली आहे. माती चोरून नेणाऱ्या डंपर मालकांकडून सुमारे ६ लाखांचा दंड वसूल केला जाणार आहे.
मातीची रॉयल्टी बुडवणाऱ्या रस्ता ठेकेदाराचे 2 ट्रक जप्त - News about Mumbai - Nashik National Highway
मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामासाठी लागणारी माती शासनाचा महसून नभरता आणली जात असल्याच्या तक्रारी तहसीलदारांकडे आल्या होत्या. याची दखल घेत सहसीलदारांनी ठेकेदाराचे दोन मातीची वाहतूक करणारे ट्रक जप्त केले.
ठाणे : मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, या रस्त्याच्या भरणीसाठी लागणारी माती चोरून आणून त्याचा महसूल (रॉयल्टी) शासनाकडे जमा केला जात नाही. याविरोधात नागरिकांनी तहसीलदारांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनुसार शनिवारी वडपे बायपास येथे धडक कारवाई करून मातीने भरलेले 2 डंपर जप्त करण्यात आले.
भिवंडी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी हजारो ब्रास माती वापरली जात आहे. मात्र, त्यासाठी लागणारी गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यास रस्ता ठेकेदार टाळाटाळ करून शासनाचा महसूल बुडवत आहे. याबाबत तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांनी निवासी नायब तहसीलदार महेश चौधरी, मंडळ अधिकारी दत्तात्रेय बांबळे, किरण केदार, तलाठी निलेश कांबेरे, विकास खरात, डी.के.शिंदे आदींच्या महसूल पथकासह तात्काळ कारवाई केली. त्यांनी मातीने भरलेले तीन डंपर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले आहेत. या धडक कारवाईने गौण खनिज रॉयल्टीची चोरी करणाऱ्या ठेकेदारांमध्ये एकच खळबळ माजली आहे. माती चोरून नेणाऱ्या डंपर मालकांकडून सुमारे ६ लाखांचा दंड वसूल केला जाणार आहे.
ठाणे : मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र या रस्त्याच्या भरणीसाठी लागणारी माती हि चोरून आणून त्याची महसूल रॉयल्टी शासनाकडे जमा केली जात नाही. याविरोधात नागरिकांनी तहसीलदारकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनुसार शनिवारी वडपे बायपास येथे धडक कारवाई करून मातीने भरलेले 2 डंपर जप्त केले आहेत.
भिवंडी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी हजारो ब्रास माती वापरली जात आहे. मात्र त्यासाठी लागणारी गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यास रस्ता ठेकेदार टाळाटाळ करून शासनाचा महसूल बुडवत आहे. याबाबत तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांनी निवासी नायब तहसीलदार महेश चौधरी ,मंडळ अधिकारी दत्तात्रेय बांबळे ,किरण केदार ,तलाठी निलेश कांबेरे ,विकास खरात ,डी.के.शिंदे आदींच्या महसूल पथकासह तात्काळ कारवाई करून मातीने भरलेले तीन डंपर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले आहेत.
या धडक कारवाईने गौण खनिज रॉयल्टीची चोरी करणाऱ्या ठेकेदारांमध्ये एकच खळबळ माजली आहे. तर माती चोरून नेणाऱ्या या डंपर मालकांकडून सुमारे ६ लाखांचा दंड वसूल केला जाणार आहे.
Conclusion:bhiwnadi