ठाणे : ठाणे जिल्ह्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीसह फळबागांचें प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून वातावरणीय झालेल्या बदलामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे मानवी जीवनावरच नाही तर फलोउत्पादन, शेती उत्पादनावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
उष्ण तापमानाचा फटका : अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर उष्ण तापमानाचा गेल्या दोन दिवसापासून ठाणे जिल्ह्यातील फळबागांना उन्हाची झळ लागून फळांचे प्रचंड नुकसान होत आहे. शहापूर तालुक्यातील दुर्गम परिसरात आलेल्या वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी उमेश धानके यांच्या आमराईतील आंब्यांच्या झाडावरील सर्वच आंबे उष्ण वातावरणामुळे गळून जमिनीवर पडून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता हे झालेले नुकसान कसे भरून काढायचे असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.
आंब्याचे नुकसान : शहापूर तालुक्यातील उमेश धनके हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी आपल्या जागेत गेल्या दहा वर्षापूर्वी 300 आंब्याची झाडे लावली आहेत. यामधून त्यांना दरवर्षी सात ते आठ लाख रुपये इतके या अंब्यातून उत्पन्न होते. यावर्षी ही तितकेच उत्पन्न आपल्याला मिळेल या आशेत ते होते. मात्र गेल्या तीन दिवसांच्या वाढत्या तापमानामुळे आंब्यावरती मोठ्या परिणाम झाला आहे. आंबे झाडावरून गळून पडायला सुरुवात झाली असुन झाडाखाली आंब्यांचा खच पडला. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
280 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान : कृषी अधिकारी यांनी या घटनेची प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली आहे. गेले तीन दिवस या परिसरातील तापमान 41 अंश डिग्री पेक्षा अधिक होते. त्यामुळे फळ उत्पादनाला त्याचा फटका बसल्याचे कृषी पर्यवेक्षक अधिकारी महादेव कालापाड यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे मार्च महिन्यातील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 273 हेक्टरवरील फळपिकांस 7 हेक्टरवरील बागायती आदी शेतातील तब्बल 280 हेक्टरवरील फळबागांसह पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नुकसान भरपाईची अपेक्षा : जिल्ह्यात झालेल्या नुकसामुळे शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे यंदाच्या अवकाळी पावसात वीज अंगावर कोसळून शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहे. तर आंब्या सारख्या फळपिकाखाली 273 हेक्टरचे नुकसान झाले आहे. 33 टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या 836 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे.
- Trimbakeshwar Temple closed : त्र्यंबकेश्वर मंदिर जानेवारी महिन्यातील 'या' तारखेपर्यंत राहणार बंद
- Nashik Trimbakeshwar Temple: मंदिरातील पिंडीवर बर्फ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे अंनिसने आवाहन
- Sri Kshetra Trimbakeshwar : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी; चला तर मग आपणही घेऊया दर्शन..