नवी मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये दोन उलटली असताना आता येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात होणार (Navi Mumbai Traffic Police) आहे. सरकारनेही बहुतेक सर्वच निर्बंध उठवले आहेत. मात्र याला वाहतूक विभाग अपवाद आहे. कारण कोरोना कालावधीत मद्यपी चालकांविरुद्ध पोलीसांची थंडावलेली मोहीम पुन्हा तीव्र झाली आहे. कोरोना संसर्गामुळे ब्रेथ अॅनालायझर वापण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र यंदा थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रेथ अॅनालायझरचा वापर सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतादरम्यान दारू पिऊन गाडी चालवाल, तर जेलची हवा नक्की खाल, असा इशारा नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिला आहे. नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करा. मात्र वाहतुकीच्या नियमांना पायदळी तुडवू नका, असेही काकडे (breathalyser from Traffic Police ) म्हणाले.
ड्रंक अँड ड्राइव्ह : तुमच्या आनंदावर कुठेही विरझन पडणार नाही, याची काळजी आम्ही नक्की (occasion of 31 December Party) घेऊ. मात्र आपले सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगत नवी मुंबई आयुक्तालय परिसरात 31 डिसेंबरला 33 अधिकारी आणि 318 अंमलदार तैनात असणार असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली. विशेष म्हणजे लोणावळा, अलिबाग पुढे गोवा या पर्यटनस्थळी जाण्यासाठी नवी मुंबईतूनच प्रवास करावा लागतो. नवीन मोटार कायद्याची नुकतीच मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यात आली असून वाढीव रकमेनुसार दंड आकारण्यात येत आहे. नवीन वर्ष एक दिवसांवर येऊन ठेपले असून नवी मुंबईत रात्री उशिरापर्यंत दारूच्या पार्ट्या रंगताना दिसत आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्री दारू पिऊन नशेत वाहन चालवण्याच्या घटना अधिक घडतात. यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलीसांच्या वतीने 'ड्रंक अँड ड्राइव्ह'ची मोहीम (Drunk and Drive test) हाती घेण्यात आली आहे.
थर्टी फर्स्टची रात्र : मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने या मोहिमेला काहीसा ब्रेक लागला होता. विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी मद्यपी चालकांना तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रेथ अॅनालायझर बंदी घालण्यात आली (Traffic Police ready for thirty first) होती. कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असले, तरी देशात त्याचा फारसा प्रभाव नाही. त्यातच सर्व निर्बंधही उठवण्यात आल्याने मोठ्या संख्येने नागरिक थर्टी फर्स्टच्या रात्री घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. कोरोनाकाळात चालकाने मद्य प्राशन केल्याचा संशय आल्यास त्याची रुग्णालयात नेऊन रक्त तपासणी केली जात होती. आता मात्र जागेवरच दारू घेतल्याचे कळणार असल्याने मद्यपी चालकांची आता खैर नाही. त्यामुळे वाहनचालकांनी दारू पिऊन गाडी चालवू नये, असे आवाहन नवी मुंबई वाहतूक पोलीसांमार्फत करण्यात आले आहे. बार, हॉटेल्स, पबनेही ग्राहकांना याबाबत सूचित करण्याचे आवाहन पोलीसांनी केले (Drunk and Drive test Traffic Police ) आहे.