ETV Bharat / state

ठाणे : 'ड्राईव्ह इन' लसीकरण सुविधा सुरू; फक्त नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार - drive in vaccination thane news

शहरात लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राइव्ह इन' सुविधा ठाणे महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. विविनाना मॉलच्या पार्किंग केंद्रावर नोंदणी केलेल्या 100 जेष्ठ नागरीकांच दुसरा डोस देण्यात येत आहे.

drive in vaccine service start in thane
'ड्राईव्ह इन' लसीकरण सुविधा सुरू
author img

By

Published : May 12, 2021, 3:33 PM IST

Updated : May 12, 2021, 4:28 PM IST

ठाणे - विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांसाठीच 'ड्राइव्ह इन' लसीकरण केंद्र आजपासून सुरू करण्यात आले आहे. केवळ 100 ज्येष्ठ नागरिकांनाच दुपारी 2 ते 5 या वेळेत कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येत आहे. दरम्यान, सदर केंद्रावर फक्त कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येत आहे.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा.

शहरात लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राइव्ह इन' सुविधा ठाणे महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. विविनाना मॉलच्या पार्किंग केंद्रावर नोंदणी केलेल्या 100 जेष्ठ नागरीकांच दुसरा डोस देण्यात येत आहे.

drive in vaccine service start in thane
लसीकरण केंद्रावर लावण्यात आलेली सूचना.

हेही वाचा - गोव्यात ऑक्सिजन अभावी २६ कोरोना रुग्णांचा बळी; टँकर चालक नसल्याने ऑक्सिजन तुटवडा

नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन -

ही सुविधा ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. फक्त दुसरा डोसच या केंद्रावर घेता येणार आहे. तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. सदरच्या केंद्रावर नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांनाच कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी पहिल्या डोससाठी नोंदणी केली आहे त्यांना लस देण्यात येणार नाही. यामुळे त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - सांगलीत तयार झाले कोरोनावर इंजेक्शन! रुग्ण ठणठणीत बरा होणार, कंपनीचा दावा

Last Updated : May 12, 2021, 4:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.