ETV Bharat / state

कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांकडून नालेसफाईचा दावा; अद्यापही कचरा-गाळ जैसे थे

नाल्याचे डम्पिंग ग्राउंड बनले आहे. नाल्यात फेकलेले प्लास्टिकचे थरामुळे पाणी वाहून जाण्यास प्रतिबंध होत आहे. अधिकारी मात्र ७० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही ठेकेदार नाल्यापर्यंत पोहोचला नसल्याचे दिसून येत आहे .

ठाणे महापालिकेच्या हद्दीतील अस्वच्छ असलेला नाला
author img

By

Published : Jun 4, 2019, 8:13 AM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील ९६ नाल्याची सफाई करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र, पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्याप काही मोठ्या नाल्यातील कचरा-गाळ जैसे थे आहे. त्यामुळे पावसाळ्यात शहरे तुंबण्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ९६ मोठे, तर ५४ हजार १२५ मीटर लांबीचे लहान नाले आहे. या नाल्याच्या सफाईसाठी तब्बल साडेसहा कोटी रुपयाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. याच दरम्यान लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे नालेसफाई रखडली होती. अखेर निवडणूक झाल्यानंतर मतमोजणीदरम्यान पालिका अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेत १० मे रोजी नालेसफाईसाठी स्थायी समितीची अधिकृत मंजुरी मिळवली. तसेच ठेकेदाराला काम करण्याचे आदेश देण्यात आले. त्यापूर्वी देखील ठेकेदाराला नालेसफाईचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्याकडून करण्यात आला होता. मात्र, जून उजाडला तरी मोठ्या नाल्यातील कचरा, गाळ जैसे थे आहे. काही नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे. मात्र, अजूनही तो नाल्याच्या काठावरच जमा करून ठेवलेला आहे. त्यामुळे या नाल्याच्या जवळून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.

नालेसफाई योग्य प्रकारे झाली आहे की नाही, यासाठी नालेसफाईचे व्हिडिओ शुटींग करण्याचे आदेश प्रशासनाकडून ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात नाले सफाईचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानक नाला, सर्वोदय नाला, कल्याण पूर्वेकडील ओव्हर ब्रिज जवळील नाला, संतोष नगर नाला, डोंबिवलीतील कोपर नाला यासारख्या अनेक नाल्यात आजही मोठ्या प्रमाणात गाळ आणि प्लास्टिकचा खच पडलेला आहे. नाल्याचे डम्पिंग ग्राउंड बनले आहे. नाल्यात फेकलेले प्लास्टिकचे थरामुळे पाणी वाहून जाण्यास प्रतिबंध होत आहे. अधिकारी मात्र ७० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही ठेकेदार नाल्यापर्यंत पोहोचला नसल्याचे दिसून येत आहे .

कल्याण डोंबिवलीत नालेसफाईची बोंब; अद्यापही नाल्यातील कचरा-गाळ अर्ध्याहून अधिक जैसे थे

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील ९६ नाल्याची सफाई करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आला आहे. मात्र पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्याप काही मोठ्या नाल्यातील कचार- गाळ जैसे थे आहे. त्यामुळे पावसाळ्यात शहरे तुंबण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ९६ मोठे तर ५४ हजार १२५ मीटर लांबीचे छोटे नाले  असून या नाल्याच्या  सफाईसाठी तब्बल साडे ६ कोटी रुपयाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या.  याच दरम्यान लोकसभेची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे नालेसफाई रखडली होती. अखेर निवडणूक झाल्यानंतर मतमोजणी पर्यतच्या दरम्यान पालिका अधिकार्यांनी निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेत १० मे रोजी नालेसफाईसाठी स्थायी समितीची अधिकृत मंजुरी मिळवत ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली. मात्र तत्पूर्वीच ठेकेदाराला नालेसफाईचे काम सुरु करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्याकडून करण्यात आला होता. जून उजाडला तरी मोठ्या नाल्यातील कचरा, गाळ नाल्यातच असून ज्या नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे. तो गाळ देखील मागील १० दिवसापासून नाल्याच्या काठावर जमा करून ठेवण्यात आल्याने नागरिकांना या नाल्याच्या कडेने नाक मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे.

नालेसफाई योग्य प्रकारे झाली आहे किवा नाही याची माहिती व्हावी यासाठी नालेसफाईचे व्हिडीओ शुटींग करण्याचे आदेश प्रशासनाकडून ठेकेदाराला देण्यात आले असले तरीही प्रत्यक्षात नाले सफाईचे काम अतिशय संथ गतीने सुरु असून ठेकेदाराला नालेसफाईसाठी पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे. कल्याण पश्चिमेला रेल्वे स्टेशन नाला, सर्वोदय नाला,  कल्याण पूर्वेकडील ओव्हर ब्रिज जवळील नाला, संतोष नगर नाला डोंबिवलीतील कोपर नाला यासारख्या अनेक नाल्यात आजही मोठ्या प्रमाणात गाळ आणी प्लास्टिकचा खच पडला असून नाल्याचे डम्पिंग ग्राउंड बनले आहे. नाल्यात फेकलेले प्लास्टिकचे थर पाण्याच्याही वर आले असून यामुळे पाणी वाहून जाण्यास प्रतिबंध होत आहे. अधिकारी मात्र ७० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात अद्यापही ठेकेदार नाल्यापर्यंत पोहचला नसल्याचे दिसून येत आहे .

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.