ETV Bharat / state

World record : 'तो' धावला आणि त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला; डोंबिवलीकर विशाकने घातली विश्वविक्रमाला गवसणी

सलग ६१ दिवस दररोज ४२ किलोमीटर धावणाऱ्या डोंबिवलीकर विशाकने आज विश्वविक्रमाला गवसणी ( world record broken ) घातली आहे. आज विशाकने विश्वविक्रमाला गवसणी घातल्यांनंतर महापालिका आयुक्त ( Municipal Commissioner ), डोंबिवली मधील विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनीधींनी विशाकचे कौतुक केले.

World record
विशाकने आज विश्वविक्रमाला गवसणी घातली
author img

By

Published : Nov 1, 2022, 12:39 PM IST

ठाणे : सलग ६१ दिवस दररोज ४२ किलोमीटर धावणाऱ्या डोंबिवलीकर विशाकने आज विश्वविक्रमाला गवसणी ( world record broken ) घातली आहे. या आधी सलग ६० दिवस ४२ किमी धावण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर होता. आता हा विक्रम विशालने मोडत आपल्या नावाने नवा विक्रम नोंदवला आहे. त्याच्या या मेहनतीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने ( Guinness Book of World Records ) घेतली आहे. आज विशाकने विश्वविक्रमाला गवसणी घातल्यांनंतर महापालिका आयुक्त, डोंबिवली मधील विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनीधींनी विशाकचे कौतुक केले.

डोंबिवलीकर विशाकने घातली विश्वविक्रमाला गवसणी

गेल्या सात वर्षापूर्वी विशालला धावण्याची आवड : विषक स्वामी हा २९ वर्षीय तरुण डोंबिवली स्टार कॉलनी मध्ये आपली आई, वडील बहिणी सह राहतो. विशाल हा मूळचा केरळचा आहे. मात्र त्याचं कुटुंब नोकरी धंदा निमित्त डोंबिवलीत स्थायिक झाले. विशाल एका खाजगी विमा कंपनीत काम करतो, त्याची कंपनी बंगलोरला असल्याने तो सध्या वर्क फ्रॉम होम करत आहे. गेल्या सात वर्षापूर्वी विशालला धावण्याची आवड निर्माण झाली. विशालने धावणे सुरू केलं अनेक स्पर्धेत भाग घेत त्याने त्या स्पर्धा जिंकल्या आहे. विशाल त्याचे आई व बहिणीचा देखील पाठिंबा मिळत होता.

२१ दिवस दररोज २१ किलोमीटर विक्रम : याच दरम्यान कॅन्सर जनजागृतीसाठी धावणाऱ्या कॅनडामधील टेरीफॉक्स या इसमाची कथा त्यांनी ऐकली त्याचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून आता लोकांमध्ये धावण्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशाल आपलं धावून सुरूच ठेवलं. सलग २१ दिवस दररोज २१ किलोमीटर हा विक्रम देखील विशाक च्या नावावर आहे. हा विश्वविक्रम केल्यानंतर तो थांबला नाही त्याने 61 दिवसांचा विश्वविक्रम करण्याचा जिद्द ठेवून डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलात त्याने एक सप्टेंबर पासून पुन्हा धावणे सुरू केलं. दररोज पहाटे तीन वाजता विशाक डोंबिवली क्रीडा संकुल गाठायचा आणि धावणं सुरू करायचा, तीन वाजेपासून सुरू झालेलं त्याचं धावणं आठ वाजेपर्यंत सुरूच असायचं, सलग पाच तास न थांबता विशाल धावत होता, विशाक ४२ किलोमीटर धावत होता सातत्याने ६१ दिवस दररोज ४२ किलोमीटर धावून त्याने या विश्वविक्रमाला देखील गवसणी आज घातली.

61 व्या दिवशी त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला : त्याला धावताना पाहून अनेक डोंबिवलीकरांना प्रश्न पडायचा की हा नेमका इतका का धावतोय. काही दिवसांनी त्याच्या धावण्याचे कारण समजतात डोंबिवलीकरांनी देखील त्याला प्रोत्साहन दिलं. आज 61 व्या दिवशी त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. विश्वविक्रमाला गवसने घालतात डोंबिवलीकर यांनी ढोल ताशांच्या गजरात त्याच स्वागत केलं. डोंबिवली शहरातील विविध सामाजिक संस्था, शिंदे गट उपजिल्हाप्रमुख राजेश कदम ,काँग्रेस चे संतोष केणे यांच्यासह राजकारणी मंडळी तसेच महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी देखील विशाकची भेट घेत त्याचा कौतुक करून त्याचा सत्कार केला. यावेळी विषाकने पाठींबा व प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले माझं धावणं पुढे सुरू सुरू ठेवणार असल्याचे विशाक ने यावेळी सांगितलं, 61 दिवस झाले आता शंभर दिवसापर्यंत मी धावणार असल्याचे आत्मविश्वास विशाक ने बोलून दाखवला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.