ETV Bharat / state

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना अंमलीपदार्थ कुठून मिळाले - डॉ. नीलम गोऱ्हे

author img

By

Published : Oct 1, 2021, 5:43 PM IST

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज (शुक्रवार) डोंबिवलीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच पोलिसांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत झाला? याची माहिती घेतली.

DOMBIVLI GANG RAPE CASE : Dr. Neelam Gorhe visits victim's family
सामूहिक बलात्कारातील आरोपींना अंमलीपदार्थ कुठून मिळाले - डॉ. नीलम गोऱ्हे

ठाणे - डोंबिवलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तब्बल ३३ आरोपींनी पीडितेवर वारंवार सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज डोंबिवलीत आल्या होत्या. त्यांनी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच पोलिसांची भेट घेऊन या प्रकरणाचा नेमका कुठपर्यंत तपास झाला? याची माहिती मिळवली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सामूहिक बलात्कारच्या घटनेत आरोपी अंमली पदार्थाचे सेवन करीत होते ते त्यांना कुठून मिळाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना अंमलीपदार्थ कुठून मिळाले - डॉ. नीलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे नेमके काय म्हणाल्या?

पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींच्या विरोधात चार्जशिट दाखल करावी. मुलीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन कसे करता येईल याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. पोलिसांनी फार थोड्या वेळात आरोपींना पकडले आहे. सर्व प्रकारची प्रक्रिया पोलिसांनी केली आहे. पीडीत मुलीची शिकण्याची इच्छा आहे. तिच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काय करता येईल, त्यासाठी तिच्या पालकांशी बोलणे झाले आहे. तिच्या कुटुंबाला मदत केली आहे”, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तर पीडितेचे वडील या प्रकरणामुळे कामावर जाऊ शकले नाहीत. त्यांना कामाच्या संदर्भात मदत केली जाईल. पोलीस चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारच्या मनोधैर्य योजनेतून पीडित कुटुंबाला येत्या पंधरा दिवसात मदत दिली जाईल”, असे आश्वासन नीलम गोऱ्हे यांनी दिले.

‘आरोपींकडे अंमली पदार्थ कुठून आले’

पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ज्याबाबी पोलिसांसमोर येतील त्याप्रमाणे पोलीस कारवाई करतील, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. तसेच सामूहिक बलात्काराच्या घटनेत आरोपी अंमली पदार्थाचे सेवन करीत होते. ते त्यांना कुठून मिळाले. त्याचा तपास पोलीस करत आहेत, असे देखील निलम गोऱ्हे यांनी सांगितले.

नीलम गोऱ्हे यांच्या पोलिसांना महत्त्वपूर्ण सूचना -

डोंबिवली प्रकरणातील मुलीच्या आई वडिलांनी मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार केली होती. मात्र मुलगी परत आली होती. त्यामुळे त्यांची काही तक्रार नाही, असे सांगितले होते. मात्र ज्या मिसिंग आणि अपहरणाच्या केसेस वर्षभरात झालेल्या आहेत, ज्या गायब झाल्या आणि त्या पुन्हा परत आल्या त्या मुली सुरक्षित आहेत की नाही? पुन्हा त्यांना काही अडचणी आहेत का, शिक्षणाच्या आणि इतर अडचणी असतील तर सामाजिक संघटनेच्या मदतीने त्यांचा फॉलोअप करावा. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिलांचा एक गट जोडून द्यावा”, अशी सूचना नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना केली.

पीडितेवर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार -

डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे समोर येताच राज्यात संतापाची लाट उसळली होती. भाजपा तसेच इतर विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. 15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु असल्याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर चौकशीमध्ये जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले होते.

हेही वाचा - डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण 'असे' घडले; आत्तापर्यंत ३३ आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.