ETV Bharat / state

कल्याणात शिवसैनिक-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; भाजपचे कार्यालयही फोडले - kalyan Shivsena news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23) एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. या निषेधार्थ शिवसैनिकांनी कल्याण पश्चिम भआगातील भाजप कार्यालयावर हल्ला केला यावेळी भाजप कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Aug 24, 2021, 3:47 PM IST

कल्याण (ठाणे) - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23) एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात शेडको शिवसैनिकांकडून राणे यांचा विविध प्रकारे आंदोलन करून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच कल्याण पश्चिम भागातील कल्याण भाजप शहर कार्यलयावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यावेळी काही भाजपचे कार्यकर्ते मध्ये आलेले असता दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

बोलताना शिवसेना शहर प्रमुख

कल्याण पश्चिम भागातील अहिल्यादेवी होळकर चौकात भाजप शहर कार्यालय आहे. राणेंच्या विधानावरुन आज राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी असलेल्या भाजप कार्यलयालाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला. असे असतानाही कल्याण पश्चिम भागातील अहिल्यादेवी होळकर चौकात भाजप शहर कार्यलय आहे. या कार्यलयाची शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर आणि शहर प्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांडून हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी काही भाजप कार्यकर्ते शिवसैनीकांना रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. मात्र, या घटनेमुळे कल्याण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. आता याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हेह वाचा - कल्याणात नारायणे राणेंच्या पुतळ्याला चपलेचे हार; डोंबिवलीत 'कोंबडी चोर' म्हणत शिवसैनिकांचे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.