ETV Bharat / state

Discrimination Conspiracy : घर नाकारुन तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र? कायदा यावर अंकुश ठेऊ शकतो का? काय सांगतात कायदेतज्ञ? - विषयाकडे गंभीर पणे लक्ष

Discrimination Conspiracy : मुलुंड इथं ऑफिससाठी सदनिका बघण्यास गेलेल्या एका मराठी दाम्पत्याला सोसायटीच्या गुजराती सेक्रेटरीनं अत्यंत अपमानित करत मराठी लोकांना इथं जागा घेवू दिली जाणार नाही, असं ठणकावलं होत. यावर कोणत्याही शहरात राहून जगता येईल, अशी तरतूद असल्याचं कायदेतज्ज्ञांनी सांगितलं. त्यामुळं कोणत्याही व्यक्तीला सदनिका घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, अशी कायद्यात तरतूद असल्याचं भोसले यांनी सांगितलंय.

Discrimination Conspiracy
Discrimination Conspiracy
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 4:00 PM IST

पूजा भोसले, कायदेतज्ञ

ठाणे : Discrimination Conspiracy : सध्या मुंबई तसंच महाराष्ट्रात भेदभावाचे प्रकार वाढू लागले असून, यामुळं दोन समाजात तेढ निर्माण होऊ लागल्याचं चित्र सध्या दिसतंय. मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास मज्जाव केल्यानंतर राजकीय पक्षांनी व सामान्य नागरिकांनी, यावर प्रचंड झोड उठवली. अशाप्रकारे दोन समाजात भेदभाव करणाऱ्यांवर कायद्यामध्ये तरतूद असल्याचं जाणकारांनी सांगितलंय.

काय घडलं होतं : काही दिवसांपूर्वी मुलुंड इथं ऑफिससाठी सदनिका बघण्यास गेलेल्या एका मराठी दाम्पत्याला सोसायटीच्या गुजराती सेक्रेटरीनं अत्यंत अपमानित करत मराठी लोकांना इथं जागा घेवू दिली जाणार नाही, असं ठणकावलं. यानंतर सदर महिलेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. याचे संपुर्ण राज्यात जोरदार पडसाद उमटले. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि सामान्य नागरिकांनी सदर महिलेला पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट या गुजराती सेक्रेटरीला व त्याच्या मुलाला आपला हिसका दाखवत माफी मागण्यास भाग पाडले. परंतू, त्यानंतर लगेच मीरा भाईंदर येथील एका विकासकानं आपल्या कॉम्प्लेक्सची जाहिरात करताना फक्त मारवाडी आणि गुजराती माणसांनाच सदनिका विकल्या जातील अशी जाहिरात केली. त्यावरुन जोरदार वादंग होताच त्याच दिवशी ती जाहिरात काढून घेण्यात आली. परंतू, महाराष्ट्र आणि मुंबईत राहूनच अशा प्रकारच्या जाहिराती देण्याची हिंमत एका विशिष्ट समाजाकडून केली जाते, याचेच नवल व्यक्त होत आहे.

कोणत्याही व्यक्तीला सदनिका घेण्यापासून रोखू शकत नाही : मुंबईत अशा प्रकारे भेदभावाचे प्रकार वाढत असून, त्यामुळं या दोन समाजांमध्ये प्रचंड तेढ निर्माण होत आहे. या विरोधात माहिती देताना कायदे तज्ञ पूजा भोसले यांनी भारतीय घटनेचा दाखला देत असे निंदनीय प्रकार कसे रोखता येतील, याची माहिती दिली. भारतीय घटनेत प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य आपल्या परीनं भारतातील कोणत्याही राज्यात आणि कोणत्याही शहरात राहून जगता येईल, अशी तरतूद असल्याचं सांगितलं. त्यामुळं कोणत्याही व्यक्तीला सदनिका घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, अशी कायद्यात तरतूद असल्याचं भोसले यांनी सांगितलंय.

सरकारनं याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं : मराठी आणि गुजराती समाजात तेढ निर्माण करण्यासाठी काही माणसं विचारपूर्वक कट करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राजेश जाधव यांनी केलाय. मुंबई ही महाराष्ट्राचीच असून इथं घर घेण्यापासून मराठी माणसाला कोणीही रोखू शकत नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलाय. हे प्रकार रोखण्यासाठी कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार ठोस कारवाई केल्यास, हे प्रकार रोखता येवू शकतात. मात्र त्यासाठी ठोस राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे, जर सरकारनं या विषयाकडं गंभीर पणे लक्ष दिलं, तर हे प्रकार कायमचे बंद देखील होवू शकतात, असंही त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. Refused House to Marathi Woman : मराठी असल्यानं महिलेला मुंबईत घर नाकारलं; 'मनसे'नं दाखवला इंगा
  2. Pankaja Munde : धक्कादायक! पंकजा मुंडेंनाही मराठी असल्यानं मुंबईत घर नाकारलं, इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
  3. Raj Thackeray : '...तर गालावर वळ उठतील', मराठी महिलेला मुंबईत ऑफिससाठी जागा नाकारल्यानंतर राज ठाकरे आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.