नवी मुंबई - निवडणुकीपूर्वी नवी मुंबई भाजप मधील मतभेद दूर करण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार नवी मुंबईत आले. यावेळी त्यांनी आमदार मंदा म्हात्रे व गणेश नाईक यांची भेट घेतली, तसेच मतभेद आणि मनभेदाला भाजपमध्ये थारा नाही, असे वक्तव्ये केले.
हेही वाचा - शहरातील शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांचे फायर ऑडिट करा- प्रशांत दळवी
नवी मुंबई महानगर पालिकेच्या येणाऱ्या निवडणुकांचे नियोजन व सद्यस्थितीत नवी मुंबईत महाआघाडीच्या माध्यमातून सुरू असलेले नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण या संदर्भात समन्वय साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांची वैयक्तिक भेट घेण्यासाठी, तसेच सवांद साधण्यासाठी नवी मुंबईचा दौरा केला. शेलार यांनी भाजप नेते गणेश नाईक, मंदा म्हात्रे, रमेश पाटील हे शक्तीशाली नेतृत्व आहे व आमचा कार्यकर्ता आमच्या पक्षाची ताकत आहे, असे वक्तव्य केले.
मतभेद व मनभेदाला भाजपमध्ये स्थान नाही
नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक तोंडावर आली असली तरी येथील आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यामुळे जुने भाजप विरुध्द नवीन भाजप असा वाद उफाळून आला आहे. याचा मोठा फटका निवडणुकीत भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेवून भाजप नेते आशिष शेलार यांनी नवी मुंबईत येवून दोन्ही आमदारांची बैठक घेतली.
नवी मुंबईतील निवडणूक प्रभारी म्हणून आशिष शेलार यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. भाजपमध्ये मतभेद, मनभेदाला थारा नसल्याचे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. भाजपचे नगरसेवक फोडण्यासाठी महाविकास आघाडी पोलिसी बळाचा घाणेरडा वापर करीत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला.
हेही वाचा - गोडवा महंगाई मार गयी, साखर स्थिर गूळ-तिळाचे भाव वाढले