ठाणे : देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा खून प्रकरणी ( Shraddha Murder Case ) दिल्ली पोलिसांची चौकशी सुरू आहे. आज श्रद्धा हत्याकांड प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस मीरा भाईंदरमध्ये दाखल झाले. दिल्ली पोलिसांकडून रविवारी मिरारोडच्या नया नगर पोलिस ठाण्यात गोविंद यादव नामक व्यक्तीला चौकशीसाठी बोलवण्यात आले. यावेळी तब्बल चार तास पोलिसांनी चौकशी केली.
नेमका कोण आहे गोविंद यादव - आफताब याने वसई मधील एवरशाईन घर खाली करून दिल्ली मधील छत्तरपूर येथे शिफ्ट केले होते. त्यावेळी भाईंदर पूर्वेच्या गुडलक मूव्हर्स अँड पॅकर्स या कंपनीशी संपर्क केला होता. या कंपनीचे मालक हे गोविंद यादव आहे. गोविंद यांच्या कंपनीला आफताबने २० हजार रुपये घरचे समान शिफ्ट करण्यासाठी दिले होते. ५ जून २०२२ रोजी गुडलक कंपनीकडून वसईमधून समान दिल्लीतील छत्तरपूर येथे पोचवण्यात आले. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी रविवारी गोविंद यादव व स्थानिक पोलिसांच्या मदतीने चौकशी साठी बोलवण्यात आले होते.
गोविंद यादव काय म्हणाले - आम्हाला ऑनलाइन ऑर्डर येत असतात आम्ही ते प्रामाणिकपणे काम करतो. त्या पद्धतीने त्याचे समान आम्ही वसई मधून दिल्ली मध्ये पोहचवले. त्यावेळी मी गावी होतो. माझ्या कर्मचाऱ्यांनी ही ऑर्डर घेतली होती. पोलिसांनी मला विचारले ते मी सांगितले. मी प्रत्यक्षात आफताब किंवा श्रद्धा यांना भेटलो नाही आणि माझे कधी बोलणे देखील झाले नाही, अशी माहिती गोविंद यादव यांनी दिली.
तपास होईपर्यंत मुंबईत राहणार - दिल्ली टीम : वसईनंतर दिल्ली पोलिसांची टीम मीरा भाईंदर येथील नया नगर पोलीस ठाण्यात आली होती. आफताबने वसईवरून दिल्लीला घरचे सामान शिफ्ट केले होते. त्यावेळी ज्या मूव्हर्स आणि पॅकर्स वाल्याला दिले होते तो गोविद यादव मिरारोडचा असल्याने पोलिसांनी चौकशी त्याला बोलवले होते. त्याचे स्टेटमेंट घेऊन दिल्ली पोलीस मिरारोडमधून निघाले. दिल्ली पोलिसाचे अधिकारी मनीष म्हणाले की, जो पर्यंत तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही मुंबई, वसईमध्ये असणार.
दोघे डेटिंग अॅप बंबलवर भेटले : गॉडविन रॉड्रिग्ज यांनी असेही सांगितले की, जरी ते दोघे डेटिंग अॅप बंबलवर भेटले होते, तरीही तो तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असूनही आफताब बंबलचा वापर करत राहिला. त्याने महिलांशी संपर्क साधला. श्रद्धाने मित्रांसमोर आफताबला तो हे अॅप का वापरत आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. आफताब लोकांना दोघांचे लग्न झाले असल्याचे सांगत असे.
हत्या केल्याची कबुली - माणिकपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबरला मिसिंग दाखल करून तपासाला सुरुवात केली. या मिसिंग प्रकरणी ७ नोव्हेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप टीमसह चौकशी तपासाला गेले होते. यानंतर दिल्ली पोलिसांसोबत आरोपी आफताब याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तपासात त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. श्रद्धा हिच्या शरीराच्या तुकडे जंगलात पुरले असून दिल्ली पोलिसांना अद्याप पर्यंत पुरावे सापडले नसल्याचेही पोलीस सूत्रांकडून कळते.