मीरा भाईंदर - कोरोना महामारीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. मात्र सर्व व्यवसाय हळूहळू सुरळीत चालू झाले आहे. त्यातच राज्य सरकारने लग्न, इतर कौटुंबिक कार्यक्रमासाठी ५०पेक्षा अधिक माणसाची परवानगी दिली आहे. कार्यक्रमात ५०पेक्षा अधिक वाढवून द्यावी अन्यथा राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मीरा भाईंदर मंडप डेकोरेटर्स आणि कॅटरर्स असोसिएशनने दिला.
मीरा भाईंदरमध्ये मंडप डेकोरेटर्स आणि कॅटरर्सवर उपासमारीची वेळ आली आहे. मीरा भाईंदर मंडप डेकोरेटर्स व कॅटरर्स असोसिएशनने शासनाच्या निर्णयाविरोधात तीन दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा चेतावनी मीरा भाईंदर मनपा प्रशासनाला दिली आहे. असोसिएशनने असे म्हटले की कोरोनासारख्या महामारीसंकट काळात मंडप डेकोरेटर्स व कॅटरर्स यांच्यावर संकटाचा भार पडला आहे. मीरा भाईंदरमध्ये जवळपास तीनशे मंडप डेकोरेटर्स आहे. मंडप डेकोरेटर्समुळे हजारो लोकांना काम मिळतात. लग्नसमारंभासाठी फक्त ५० माणसांची परवानगी दिली असून त्यामध्ये देखील खर्च जास्त आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. यांच्यावर आवलंबून असलेल्या कामगारांवर उपासमारीची आज वेळ आली आहे. पालिकेला देखील निवेदन देऊन २० दिवस उलटून गेले तरी काही मनपा कडून निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे निषेध म्हणून तीन दिवस ठिय्या आंदोलन करण्याची चेतावनी मीरा भाईंदर मंडप डेकोरेटर्स व कॅटरर्स असोसिएशनने मनपा आयुक्तांना दिले आहे.