ETV Bharat / state

Attack on Shopkeeper in Thane : ठाण्यात दुकानदारावर जीवघेणा हल्ला; स्थानिकांकडून एका हल्लेखोराला बेदम मारहाण

उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणातून एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची ( Deadly attack on shopkeeper in Thane) घटना घडली आहे. तर या घटनेनंतर स्थानिकांनी एका हल्लेखोराला पकडून बेदम मारहाण ( assailant was beaten to death by locals in Thane ) केली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तीन हल्लेखोर विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

author img

By

Published : Mar 25, 2022, 7:37 PM IST

Updated : Mar 25, 2022, 7:45 PM IST

Deadly attack on shopkeeper in Thane
ठाण्यात दुकानदारावर जीवघेणा हल्ला

ठाणे - पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणातून एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना ( Deadly attack on shopkeeper in Thane) उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. तर या घटनेनंतर स्थानिकांनी एका हल्लेखोराला पकडून बेदम मारहाण ( assailant was beaten to death by locals in Thane ) केली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तीन हल्लेखोर विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. कुणाल जगन्नाथ सोनावणे (वय, २८, रा. आशाळेगाव) असे जखमी व्यापाराचे नाव आहे. तर सूरज विश्वकर्मा असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

दुकानदाराची प्रतिक्रिया

दुकाना शेजारी दबा धरून बसवले होते हल्लेखोर - उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडून जाणाऱ्या रस्त्यावर कुणाल सोनवणे याचे कपड्याचे दुकान असून ते आशाळे गावात कुटूंबासह राहतात. तर मुख्य आरोपी सूरज ही आशाळे गावातच राहतो. काही दिवसापूर्वी कुणाल व सूरजमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपी सूरजच्या वडिलांनी त्याला घरातून बाहेर काढले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून मुख्य आरोपी सूरज हा त्याच्या तीन साथीदारांसह गुरुवारी रात्रीच्या सुमारास कुणालच्या दुकाना शेजारी दबा धरून बसवले होते. त्याच सुमारास कुणाल दुकानबंद करत असताना आरोपी सूरज आणि त्याच्या तीन साथीदारांनी कुणालवर लाकडी दांडक्याने हल्ला केला. यात कुणालच्या डोक्याला आणि पायावर गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आरोपींचा शोध सुरू - तर अचानक झालेल्या व्यापाऱ्यावर हल्ल्या प्रकरणी व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान यातील एका हल्लेखोराला स्थानिकांनी पकडून बेदम मारहाण ही केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी सूरज विश्वकर्मा आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाखरे करीत आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray Warns BJP : ..चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या'.. कुटुंबियांच्या बदनामीवर उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

Last Updated : Mar 25, 2022, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.