ठाणे - कल्याण रेल्वे स्थानकसमोरील टॅक्सी स्टँडवर एका अज्ञात व्यक्तीने ठेवलेल्या काळ्यारंगाच्या बॅगमध्ये महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा - उन्नाव : 'त्यांना' तत्काळ फाशी द्या किंवा हैदराबादसारखे एन्काऊंटर करा, पीडितेच्या वडिलांची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्टेशन समोर असलेल्या वोडाफोन गॅलरीजवळ एक व्यक्ती रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रिक्षामध्ये बॅग घेऊन जात होता. त्याचवेळी रिक्षा चालकाला त्या काळ्या रंगाच्या बॅगचा वास आल्याने रिक्षावाल्याने त्याला हटकले असता तो व्यक्ती घाबरून बॅग घटनस्थळी सोडून स्टेशनच्या बाजूला पळून गेला. रिक्षावाल्यांनी एसटी स्टँड चौकीला बीट मार्शल यांना याची माहिती दिली.
हेही वाचा - 'आरोपींचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश, कायदे कडक करण्याची गरज'
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या बॅगची तपासणी केली असता या बॅगमध्ये एका महिलेचा कमरेपासून खालचा भाग आढळून आला. या महिलेचे अंदाजे वय वीस ते पंचवीस वर्षे असून तीचा रंग गोरा आणि पायामध्ये पिवळी लेगिंग घातलेली होती.
हेही वाचा - उन्नाव प्रकरण : पीडितेवर थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करत महिलेचा मृतदेह महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पुढील तपासणीकरता पाठण्यात आला आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी अनोखळी महिलेची हत्या करून पुरवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महात्मा फुले चौक पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समांतर तपास सुरू केला आहे.