ETV Bharat / state

कोरोना रुग्णांना वाढीव बिले देणाऱ्या रुग्णालयाची मान्यता रद्द; ठाणे महापालिकेची राज्यातील पहिली कारवाई

कोरोना महामारीत काही खासगी रुग्णालय रुग्णांची लूट करत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. या पार्श्वभुमीवर खासगी रुग्णालयांकडून होणारी ही लूट थांबवण्यासाठी महापालिकेने ऑडीटर नेमले असून यामध्ये होरीझन प्राईम रुग्णालय दोषी आढळले आहे. त्यांनी 56 प्रकरणांमध्ये रुग्णाकडून जादा रक्कम वसूल केल्याचे समोर आले आले. त्यानुसार पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी होरीझन प्राईम रुग्णालयावर कारवाई केली.

de-recognition-of-hospitals-that-pay-increased-bills-to-corona-patients-in-thane
कोरोना रुग्णांना वाढीव बिले देणाऱ्या रुग्णालयाची मान्यता रद्द; ठाणे महापालिकेची राज्यातील पहिली कारवाई
author img

By

Published : Jul 25, 2020, 5:28 PM IST

Updated : Jul 25, 2020, 6:09 PM IST

ठाणे - कोरोनाच्या काळात वाढीव बिले देऊन रुग्णांना लुटणाऱ्या होरीझन प्राईम रुग्णालयावर राज्यातील पहिली कारवाई करण्यात आली आहे. कोविड रुग्णालय म्हणून या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली असून, पुढील महिन्याभरासाठी रुग्णालयाची नोंदणीही निलंबित केली आहे.

कोरोना रुग्णांना वाढीव बिले देणाऱ्या रुग्णालयाची मान्यता रद्द; ठाणे महापालिकेची राज्यातील पहिली कारवाई

कोरोना महामारीत काही खासगी रुग्णालय रुग्णांची लूट करत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. खासगी रुग्णालयांकडून होणारी ही लूट थांबवण्यासाठी महापालिकेने ऑडीटर नेमले असून यामध्ये घोडबंदर येथील प्रशस्त, नामांकित हॉस्पिटल म्हणून ओळख असलेले होरीझन प्राईम रुग्णालय दोषी आढळले आहे. त्यांनी 56 प्रकरणांमध्ये रुग्णाकडून जादा रक्कम वसूल केल्याचे समोर आले आले. त्यानुसार पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी होरीझन प्राईम रुग्णालयावर कारवाई केली.

ठाणे महापालिकेचे लेखापरिक्षक व उपजिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विशेष ऑडीटरने होरीझन प्राईम रुग्णालयाच्या घोटाळयाची पूर्ण चौकशी केली. २ एप्रिल ते १२ जुलैपर्यंत या रुग्णालयात एकून ७९७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. ऑडीटरकडे तक्रारी आलेल्या ५७ बीले तपासण्यात आली असून त्यापैकी ५६ बीलांमध्ये ६ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आकारल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात ऑडीटरने हॉस्पिटल व्यवस्थापनाला २० जुलैला नोटीस बजावून दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्याची ताकीद दिली. तरीही रुग्णालय व्यवस्थापनाने अद्यापी कोणताही लेखी खुलासा केलेला नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांनी रुग्णालयावर कारवाई केली आहे. तसेच, कोविड रुग्णालय म्हणून त्याची मान्यता रद्द केली असून पुढील महिन्याभरासाठी त्याची नोंदणीही निलंबित केली आहे. त्यामुळे या रुग्णालयाला कोणत्याही नवीन रुग्णाला दाखल करून घेता येणार नाही.

रुग्णालयाची मान्यता रद्द झाली असली तरी येथे उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांचे उपचाराविना हाल होणार नाही याची संपूर्ण खबरदारी पालिकेने घेतली आहे. आय.सी. .एम. आर. तसेच शासन निर्णयानुसार रुग्णांना डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याच्या उपचाराची जबाबदारी पालिकेने घेतली आहे. यासाठी रुग्णालयाचा ताबा घेण्यात आला असून पालिकेच्या वतीने औषध विभागाच्या डॉ. प्रेषिता क्षीरसागर, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे कनिष्ठ लेखापरिक्षक बाळासाहेब कराडे यांचे द्विसदस्यीय पथक पूर्णवेळ रुग्णालयात तैनात ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - नालासोपाऱ्यात 15 मिनिटांत ई-पास देण्यासाठी 1500 रुपये घेणाऱ्या दोघांना अटक

Last Updated : Jul 25, 2020, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.