ETV Bharat / state

कोपरखैरणेमध्ये झाड कोसळून सहा वाहनांचे नुकसान - नवी मुंबई लेटेस्ट न्यूज

कोपरखैरणे सेक्टर ११ येथील फाम सोसायटीमध्ये शनिवारी जोरदार पावसामुळे झाड कोसळले. हे झाड पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर पडल्याने यात सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

झाड कोसळून सहा वाहनांचे नुकसान
झाड कोसळून सहा वाहनांचे नुकसान
author img

By

Published : Jun 12, 2021, 7:08 PM IST

नवी मुंबई - कोपरखैरणे सेक्टर ११ येथील फाम सोसायटीमध्ये शनिवारी जोरदार पावसामुळे झाड कोसळले. हे झाड पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर पडल्याने यात सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

१७ मे रोजी तौक्ते चक्रीवादळात नवी मुंबईत १२२ झाडे पडली होती. या घटनेनंतर शहरातील धोकादायक वृक्षांची ३१ मे पर्यत छाटणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक वृक्षांची छाटणी सुरू होती. मात्र याचदरम्यान हे झाड कोसळले. यात सहा वाहनांचे नुकसान झाले. एखाद्या सोसायटीमध्ये जर धोकादायक वृक्ष असेल, तर त्याची माहिती सोसायटीच्या वतीने महापालिकेला दिल्यास त्या वृक्षाची छाटणी करण्यात येते. मात्र बऱ्याचवेळेस सोसायट्या याकडे दुर्लक्ष करतात, यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडतात.

झाड कोसळून सहा वाहनांचे नुकसान

रात्रीच्या वेळी कोसळले झाड

कोपरखैरणे सेक्टर ११ मधील फाम सोसायटीत देखील शुक्रवारी जोरदार पावसामुळे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. हे झाड येथे पार्क असलेल्या वाहनांवर पडल्याने सहा वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रीची वेळ असल्याने या वाहनात कुणीही नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अशी माहिती वाशी अग्निशमन दलाचे अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिली. तर याच सोसायटीत शुक्रवारी सायंकाळी एका इमारतीचा सज्जा पडल्याची घटना देखील घडली आहे.

हेही वाचा -राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शरद पवार विरोधकांचे उमेदवार..?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.