ETV Bharat / state

ईडली-डोसा तयार करण्यास उशीर, ग्राहकाने कुकच्या डोक्यात घातली लोखंडी पळी

प्रभात गार्डनजवळील साईबाबा डोसा कॉर्नरमध्ये कुक रवी हा ग्राहकांना ऑर्डरप्रमाणे डोसा तयार करून देत होता. त्याचवेळी सायंकाळी साडे ५ च्या सुमारास आरोपी रवी तेजी आणि त्याचा मित्र ईडली-डोसा खाण्यासाठी या ठिकाणी आले. त्यांनी ईडली-डोसाची ऑर्डर दिली. मात्र, पदार्थ तयार करून देण्यास उशीर झाल्याने रागाच्या भरात या दोघांनी कुक रवी पडयाची यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली.

ईडली-डोसा तयार करण्यास उशीर केला म्हणून कुकच्या डोक्यात घातली लोखंडी पळी

author img

By

Published : Feb 13, 2020, 8:43 PM IST

ठाणे - कुकने ईडली-डोसा तयार करण्यास उशीर केला म्हणून एका ग्राहकाने कुकच्या डोक्यात सांबर काढण्याच्या लोखंडी पळीचा प्रहार केल्याची घटना घडली आहे. यात तो कुक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील प्रभात गार्डनजवळील असलेल्या साईबाबा डोसा कॉर्नरमध्ये घडली. रवी पडयाची (३३) असे मारहाणीत दुखापत झालेल्या कुकचे नाव आहे. तर, रवी तेजी असे अटक केलेल्या ग्राहकाचे नाव असून त्याचा साथीदार फरार झाला आहे.

माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प नं. ५ येथील प्रभात गार्डनजवळील साईबाबा डोसा कॉर्नरमध्ये कुक रवी हा ग्राहकांना ऑर्डरप्रमाणे डोसा तयार करून देत होता. त्याचवेळी सायंकाळी साडे ५ च्या सुमारास आरोपी रवी तेजी आणि त्याचा मित्र ईडली-डोसा खाण्यासाठी या ठिकाणी आले. त्यांनी ईडली-डोसाची ऑर्डर दिली. मात्र, पदार्थ तयार करून देण्यास उशीर झाल्याने रागाच्या भरात या दोघांनी कुक रवी पडयाची यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली.

हेही वाचा - गणेश नाईकांच्या गडाला सरुंग, भाजप नगरसेवकांचा गट अजित पवारांच्या भेटीला

या मारहाणी दरम्यान आरोपी रवी तेजीने रागाच्या भरात सांभर काढण्याच्या लोखंडी (पळी) चमचाने रवी पडयाची याच्या डोक्यात प्रहार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात कुक पडयाची यांनी हल्लेखोर ग्राहक रवी तेजी आणि त्याच्या मित्राविरुध्द हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत रवी तेजी याला तत्काळ अटक केली. अधिक तपास पो.ना. दाबाडे करीत आहेत.

हेही वाचा - पत्नीसोबत संबंध असल्याचा संशय; पतीचा शेजाऱ्यावर कोयत्याने हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.