ठाणे - बहिणीला व्हॉट्सअॅपवर अनेकदा कॉल व मॅसेज करून त्रास देणाऱ्या दोघांची शिर्डीत हत्या करून त्यांचे मृतदेह कसारा घाटात दोन वेगवेळ्या ठिकाणी फेकण्यात आले होते. यातील चार आरोपीना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला दोन महिन्यांच्या तपासाअंती अटक करण्यात यश आलंय. (Harassed Sister on WhatsApp) (Two Murder Case Thane) (Thane Police News) (Thane Police News)
आरोपींना अटक - मनोज शिवप्पा नाशी (वय 24), कुणाल प्रकाश मुदलियार (वय 23), प्रशांत अंबादास खुलुले (वय 25), फिरोज दिलदार पठाण (वय 19) असे अटक आरोपींची नावं आहेत. हे चारही आरोपी शिर्डीमधील रामनगरमध्ये राहणारे आहेत. तर सुफीयान सिराबक्ष घोणे (वय 33 रा. लोणी) व साहिल पठाण (वय 21, रा.सोनगाव) असे हत्या झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत.
19 जून रोजी उघडकीस आली घटना - शहापूर तालुक्यातील कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात व्यक्तीचे मृतदेह मुंबई - नाशिक महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात फेकले असल्याची माहिती कसारा पोलिसांना 19 जून रोजी दुपारच्या सुमारास मिळाली होती. त्यावेळी पहिला मृतदेह मुंबई- नाशिक महामार्गावर वाशाळा फाटा या ठिकाणी आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत असतानाच, दुसरा मृतदेह नाशिक- मुंबई महामार्गावरील कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंटजवळ मार्गालगतच्या झाडाझुडपात असल्याची माहिती मिळाली होती. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी पंचनामे करत, दोन्ही घटनेतील अज्ञात आरोपीविरोधात हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून पोलीस तपास सुरू केला होता.
आरोपींचा सुगावा काढण्यात पोलिसांना यश - कसारा पोलिसासह ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, एपीआय भास्कर जाधव यांच्यासह पथकाने दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला. महिनाभरानंतर नगर जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघे तरुण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. त्या मृतदेहाची ओळख पटवून तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन पथकं तयार करून आरोपींचा सुगावा काढण्यात यश आले. त्यांना २४ ऑगस्टला शिर्डीतून ताब्यात घेतले.
चारही आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी - चारही आरोपींची चौकशी पथकाने सुरू केली असता, मुख्य आरोपी मनोज नाशी असल्याचे समोर आलं. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, मृत सुफीयान आणि साहिल हे दोघेही सोशल मीडियावर तर कधी व्हॉट्सअॅपवर अनेकदा कॉल व मेसेज करून लोणी येथील मानलेल्या बहिणीस त्रास देत होते. याच घटनेचा राग मनात धरून तीन मित्रांच्या मदतीने दोघांची शिर्डीत हत्या करून त्यांचे मृतदेह चादरीत गुंडाळून कसारा घाटात वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याची कबुली आरोपीनी पोलिसांना दिली. दरम्यान, चारही आरोपीना २५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनवाल्याची माहिती कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी दिली.
हेही वाचा -