ETV Bharat / state

कोरोना नियंत्रणासाठी ठाण्यात टास्क फोर्सची निर्मिती, जिल्हा समितीचीही स्थापना - कोरोना विषाणू

ठाणे महापालिकेच्या डीन डॉ.प्रतिभा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यांचे टास्क फोर्स करण्यात आले आहे. या टास्क फोर्स सोबतच जिल्हा समितीचे देखील गठण करण्यात आले आहे.

Thane Corona News
ठाणे कोरोना बातमी
author img

By

Published : Jul 29, 2020, 8:33 PM IST

ठाणे - राज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यासाठी देखील टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. ठाणे जिह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावास आळा घालणे, गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांच्या उपचारांबाबत बाबतीत व्यवस्थापन करणे आणि कोविड रुग्णालयात विशेषतज्ञ आणि पॅरामेडिकल स्टाफबाबत शासनास उपाययोजना सुचवणे, अशा तीन स्तरावर टास्क फोर्स काम करणार आहे.

ठाणे महापालिकेच्या डीन डॉ.प्रतिभा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यांचे टास्क फोर्स करण्यात आले आहे. या टास्क फोर्स सोबतच जिल्हा समितीचे देखील गठन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची नोंद देशपातळीवर देखील घेण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यासाठी देखील १४ जणांच्या टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. गुरुवारपासून टास्क फोर्स कामाला देखील सुरुवात करण्यात येणार आहे.

या टास्क फोर्सची निर्मिती ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी मेडिकल महाविद्यालयाच्या डीन डॉ. प्रतिभा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. यामध्ये औषधवैद्यशास्रच्या एम.डी डॉ. प्रशिता क्षीरसागर, डॉ केतकी पटवर्धन (सहयोगी प्रधयापक, राजीव गांधी मेडिकल कॉलेज), डॉ रवींद्र सांगलीकर (वैद्यकीय अधिकारी, वेदांत रुग्णालय), डॉ. मिलींद उबाळे (सहयोगी प्रा. राजीव गांधी मेडिकल कॉलेज),डॉ दिनेश समेल ( सहयोगी प्रा. राजीव गांधी मेडिकल कॉलेज), डॉ मुरुडकर ( मुख्य आरोग्य अधिकारी, ठा.म.पा), डॉ पडवळ ( मुख्य आरोग्य अधिकारी, मीरा-भाईंदर, म.न.पा), डॉ. कदम ( मुख्य आरोग्य अधिकारी, कल्याण डोंबिवली), डॉ बाळासाहेब सोनावणे (मुख्य आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका), डॉ रिजवानी ( मुख्य आरोग्य अधिकारी, उल्हासनगर महापालिका ), डॉ साळवे (वैद्यकीय अधिकारी वर्ग १, जिल्हा सामान्य रुग्णालय), डॉ नितीन मोकाशी ( मुख्य आरोग्य अधिकारी, भिवंडी महापालिका) आणि डॉ संतोष कदम (अध्यक्ष, आय एम ए, ठाणे ) यांचा समावेश करण्यात आला आहे.

शासनाच्या दिलेल्या आदेशाप्रमाने जिल्हा स्तरावर टास्क फोर्सची निर्मिती करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. या टास्क फोर्सबरोबरच एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांची सभा बुधवारी संपन्न झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रामुख्याने राज्यात ज्याप्रमाने टास्क फोर्स आहे तशाच धर्तीवर या फोर्सचे काम असणार आहे. मृत्यूच्या ज्या घटना घडत आहे त्या कशा टाळता येतील? त्यामागची करणे कोणती आहेत? याचा शोध घेण्याबरोबरच सुधारित आयसीएमआरच्या मार्दर्शनाखाली सुधारित उपचार पद्धतीचा अवलंब जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात होतो कि नाही, यावर नियंत्रण आणि यासंदर्भातील अभ्यास राज्य टास्क फोर्सच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील टास्क फोर्स करणार आहे. जिल्ह्यातील डॉक्टरांना मार्गदर्शन करणे, आणि वेबिनारच्या माध्यमातून बैठका घेण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच या टास्क फोर्सच्या माध्यमातून कोरोना बाधितांची संख्या कमी होईल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी कोरोना रुग्णांमध्ये ५१६ ने घट -

ठाणे जिल्ह्यासाठी वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव ही चिंतेची बाब असली तरी मंगळवारचा दिवस ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा ५१६ ने घटला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे प्रमाण असेच कमी होईल आणि यामध्ये टास्क फोर्स महत्वाची भूमिका बजावेल असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.