ETV Bharat / state

नवी मुंबईत कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांच्या सुरक्षिततेला दिले जाणार प्राधान्य

तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहेत. त्याामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक तयारी करणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले. जरी लहान मुलांपैकी काही मुले कोरोना पॉझिटिव्ह आली तरी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मुले ही कोणतीही लक्षणे नसलेली अथवा अत्यंत अल्प प्रमाणात लक्षणे असणारी असतील. मात्र काही मर्यादीत मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यावरील उपचारासाठी पुरेशा संख्येने ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स व पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

covid third wave review meeting in navi mumbai
बैठक
author img

By

Published : May 11, 2021, 9:07 AM IST

नवी मुंबई - कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या लाटेचा सर्वाधिक फटका बालकांना बसेल असंही म्हटलं गेलंय. त्याच्याच पूर्वतयारीच्या अनुषंगाने नवी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोविड टास्क फोर्समधील डॉक्टर्स तसेच अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, नवी मुंबईचे पदाधिकारी असणारे बालरोगतज्ज्ञ यांच्याशी वेबसंवाद साधत आगामी नियोजनच्या दृष्टीने सर्वांगीण चर्चा केली.

लहान मुलांना पुरेसे बेड उपलब्ध करा-

तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहेत. त्याामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक तयारी करणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले. जरी लहान मुलांपैकी काही मुले कोरोना पॉझिटिव्ह आली तरी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मुले ही कोणतीही लक्षणे नसलेली अथवा अत्यंत अल्प प्रमाणात लक्षणे असणारी असतील. मात्र काही मर्यादीत मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यावरील उपचारासाठी पुरेशा संख्येने ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स व पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

केअर टेकर निगेटीव्ह असल्यास त्यांची काळजी घ्यावी -

लहान मुलांसाठी गरजेच्या असलेल्या काही विशिष्ट चाचण्या उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी विचारविनीमय करण्यात आला. तसेच उपलब्ध वैद्यकीय मनुष्यबळापैकी काही जणांना बालकांशी संबंधित वॉर्डमध्ये तसेच आयसीयू वॉर्डमध्ये काम करण्याविषयीचे विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण आत्तापासूनच दिले जावे, या बाबींवर चर्चा करण्यात आली. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये मुलाचे आई किंवा वडील केअर टेकर म्हणून थांबणे आवश्यक ठरते या बाबींचा विचार सुविधा निर्माण करताना व्हावा. त्याचप्रमाणे ही केअरटेकर व्यक्ती कोव्हीड निगेटिव्ह असेल तर त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्याकरिता मार्गदर्शक नियमावली (SOP) तयार करणेबाबतही सूचना करण्यात आली.

लहान मुलांवर कोविड सुरक्षेचे संस्कार करावे -

सध्या कोरोनातून बरे झालेल्या काही मुलांमध्ये पोस्ट कोव्हिड आरोग्यविषयक तक्रारी आढळून येत असल्याची बाब चर्चेमध्ये विचारात घेण्यात आली. याविषयी आवश्यक दक्षता घेण्याविषयी सूचना करण्यात आल्या. कोव्हिड बाधीत रूग्ण, मग ते प्रौढ असोत की लहान मुले, त्यांच्यामध्ये लक्षणे दिसल्यास त्यांची त्वरीत टेस्ट करून घेणे अत्यावश्यक आहे. विशेषत: आपल्या लहान मुलांबाबत पालकांनी दक्षता घेऊन त्यांची टेस्टींग टाळू नये ही अत्यंत महत्वाची बाब यावेळी बालरोगतज्ज्ञांकडून अधोरेखित करण्यात आली. मास्क वापरणे हे प्रत्येक लहानथोरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून पालकांनी स्वत: मास्क वापरावाच शिवाय आपल्या मुलालाही मास्क वापरण्याची सवय लावून त्याच्या मनावर कोव्हिड सुरक्षेचे संस्कार करावे, असे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

तिसऱ्या लाटेचा प्रभाव मुलांवर जास्त प्रमाणात होणार आहे. अशा बातम्या, चर्चांमुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण असल्याने पालकांकडून याबाबत सतत विचारणा करण्यात येत असल्याचे अनुभव सांगण्यात आले. याबाबत बालरोगतज्ज्ञांनी पालकांना सद्यस्थितीची जाणीव करून देत दिलासा देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यासोबतच अगदी लहान मुलांतही कोरोना सदृष्य लक्षणे दिसल्यास ती लपवून न ठेवता लगेच टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा - राज्यात एनआयसीयू बेड वाढवा; पीडियाट्रिक टास्क फोर्सच्या राज्य सरकारला सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.