ठाणे - गृहनिर्माणमंत्री जिंतेद्र आव्हाड हे भिवंडी महापालिका आयुक्तांसोबत शहरातील विविध समस्यावर चर्चा करण्यासाठी आज पालिका मुख्यालयात आले होते. मात्र, मुख्य प्रवेश दारावरील सुरक्षेसाठी तैनाव करण्यात आलेल्या पोलिसांना धक्का देत राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयात गोंधळ घालत कोरोना नियमाला हरताळ फसला आहे.
'आव्हाडांनी टाकला गोंधळावर पडदा' -
विशेष म्हणजे हजारोच्या संख्येत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सोशल डिस्टिंगचा फज्जा उडवला. यावेळी कुठल्याही कार्यकत्यांच्या तोंडाला माक्स नव्हता. यामुळे शासनकर्तेच कोरोना नियमांची पायमल्ली करीत असल्याची चर्चा भिवंडी शहरात रंगली होती. याबाबात मंत्री आव्हाड यांना विचारले असता, 'अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे गोंधळ उडाला असेल', असे सांगत याविषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तर मुख्यालयातील लिफ्टमध्येही आव्हाड यांच्यासोबत अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिरल्याने लिफ्ट अडकून पडली होती. वेळेतच काही पदाधिकाऱ्यांना लिफ्ट बाहेर काढल्याने अनर्थ टळला. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांचे भिवंडी शहरात आगमन होताच, साईबाबा ते महापालिका मुख्यालयापर्यत त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नागरिकांना याचा मोठ मनस्ताप सहन करावा लागला.
हेही वाचा - Money Laundering Case : संजीव पालांडे यांची मुंबई हायकोर्टात धाव!