नवी मुंबई - पोटच्या मुलांना पैशाच्या हव्यासापोटी विकणाऱ्या नराधम माता पित्याचा काळा चेहरा नवी मुंबई शहरात उघडकीस आला आहे. या माता-पित्याने एक दोन नव्हे तर चक्क तीन मुलांचा सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मातेला पोलिसांनी अटक केले असून नराधम पिता फरार झाला आहे. त्याचा नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत.
नेरुळ रेल्वे स्थानक आवारात राहत होते दाम्पत्य -
नेरूळ रेल्वे स्थानकाच्या आवारात आयुब शेख (35) व शारजा शेख (30) हे दाम्पत्य राहत होते. शारजा ही गरोदर होती व प्रसूतीनंतर रेल्वे स्थानक परिसरात तिच्या बाळासह आढळून येत होती. मात्र काही दिवसांनी तिच्या जवळ बाळ नव्हते व ती एकटीच दिसत होती. नवजात बाळ शारजाजवळ नसल्याने शारजाने बाळाची बेकायदेशीर विक्री केली असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांना आला. त्यांनी याची माहिती ठाणे जिल्हा महिला बालविकास विभागाला माहिती दिली. त्यानुसार बालविकास विभागाने गुरुवारी शारदाला ताब्यात घेतले. मात्र तिचा पती आयुब फरार झाला.
धक्कादायक.. पैशासाठी माता-पित्यांनी पोटच्या तीन मुलांचा केला सौदा, माता गजाआड तर पिता फरार - माता-पित्याने पोटच्या तीन मुलांना विकले
पोटच्या मुलांना पैशाच्या हव्यासापोटी विकणाऱ्या नराधम माता पित्याचा काळा चेहरा नवी मुंबई शहरात उघडकीस आला आहे. या माता-पित्याने एक दोन नव्हे तर चक्क तीन मुलांचा सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मातेला पोलिसांनी अटक केले असून नराधम पिता फरार झाला आहे. त्याचा नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत.