ETV Bharat / state

कल्याणमध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील भागात पडले दामप्त्य

कल्याणचे मुख्य तिकीट निरीक्षक जसपाल सिंग राठोड म्हणाले, "एक विवाहित जोडपे धावत्या उद्यान एक्स्प्रेस (01301) मध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना ते प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील भागात पडले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही."

couple falls in-gap between platform and train
कल्याणमध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील भागात पडले दामप्त्य
author img

By

Published : Nov 2, 2021, 7:19 PM IST

कल्याण (ठाणे) - चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील भागात एक दामप्त्य पडल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही घटना रविवारी सकाळी ९.१२ वाजता कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४/५ वर घडली.

कोणतीही जीवित हानी नाही -

कल्याणचे मुख्य तिकीट निरीक्षक जसपाल सिंग राठोड म्हणाले, "एक विवाहित जोडपे धावत्या उद्यान एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना ते प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील भागात पडले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही."

'म्हणून वाचले'

तिकीट तपासनीस रणजित कुमार त्यांना मदत करण्यासाठी धावले आणि त्यांनी ट्रेनमधील प्रवाशांना चेन ओढण्यास सांगितले. ट्रेन काही सेकंदात थांबली पण तोपर्यंत तीन ते चार डबे निघून गेले होते. कुमार यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने या जोडप्याला सुरक्षित ठिकाणी खेचले. "दोघांनी प्लॅटफॉर्म घट्ट पकडल्यामुळे ते वाचले."

हेही वाचा - भिवंडीत माथेफिरुने दोघांची केली हत्या, आरोपीस अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.