ETV Bharat / state

Couple Commits Suicide : दुर्गाडी पुलावरून खाडीत उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या - खाडीत उडी मारून तरुण-तरुणीची आत्महत्या

दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण तरुणीने (Suicide of a Loving Couple) भिवंडी-कल्याण मार्गावरील दुर्गाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

by jumping into bay
by jumping into bay
author img

By

Published : Dec 18, 2021, 7:35 PM IST

ठाणे - दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण-तरुणीने (Suicide of a Loving Couple) भिवंडी-कल्याण मार्गावरील दुर्गाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या (Couple Commits Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. प्रशांत गोडे (वय 22 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या सोबत असलेल्या तरुणीचे नाव समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले असून हे प्रेमीयुगुल (Suicide of a Loving Couple) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा - Kadam Vs Parab : गद्दार कोण मी.. की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल

मृत प्रशांत हा कल्याणहून भिवंडीला जाणाऱ्या मार्गाने दुचाकीवरून एका तरुणीसोबत आज सायंकाळच्या सुमारास जात होता. मात्र दुर्गाडी पुलावर येताच त्या दोघांनी दुचाकी पुलावरच साईटला लावून अचानक पुलाच्या कठड्यावरून खाडीच्या पाण्यात (Commits Suicide by Jumping into Bay) उड्या मारल्या. घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळताच त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तासाभरात प्रशांतचा मृतदेह खाडी पात्रातून बाहेर काढत उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीच्या स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात नेला.

हे ही वाचा - Section 144 In Belgaum : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह २७ जणांची हिंडलगा कारागृहात रवानगी

मृत प्रशांत हा कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणारा असून त्याच्या सोबत असलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा अद्यापही शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच दोघांचे आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून कोनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.