ETV Bharat / state

प्राणी पुन्हा जंगलाकडे.. निसर्गाच्या सानिध्यात प्रकृतीत सुधारणा - संजव गांधी नॅशनल पार्क

ठाण्यात संजीव गांधी नॅशनल पार्कचा येऊर भाग म्हणजे एक पिकनिक स्पॉट आहे. दररोज हजारो लोक या भागात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यामुळे येथे मोठी वर्दळ असते. लॉकडाऊन काळात याभागात मानवी वावर कमी झाला आहे.

corona-virus-lock-dawn-animals-go-back-to-forest-in-thane
प्राणी पुन्हा जंगलाकडे
author img

By

Published : Jun 11, 2020, 4:58 PM IST

ठाणे- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. हा बदल सकारात्मक असून यामुळे या उद्यानातील पक्षी प्राणी आणि इतर वन्यजीवांमध्ये चांगला बदल असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर जंगलात प्राण्याचा वावरही वाढला आहे.

प्राणी पुन्हा जंगलाकडे

संजय गांधी उद्यानाच्या येऊर भागात मोठ्या प्रमाणात माकडे होती. मात्र, जंगलात मुबलक अन्न मिळत नसल्याने अन्नाच्या शोधात या माकडांनी नागरिवस्तीकडे आपला मोर्चा वळवळा होता. मात्र, कोरोना आला आणि देशभर लाॅकडाऊन लावण्यात आले. नागरिक घरातच बसून आहेत. त्यामुळे नागरिवस्तीत आलेल्या माकडांना जेपुर्वी खायला मिळायचे. ते आता मिळेनासे झाले आहे. त्यामुळे या माकडांनी पुन्हा आपला मोर्चा जंगलाकडे वळवला आहे. त्यामुळे अभयारण्यात तीन चार महिन्यांच्या काळात माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

ठाण्यात संजय गांधी नॅशनल पार्कचा येऊर भाग म्हणजे एक पिकनिक स्पॉट आहे. दररोज हजारो लोक या भागात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यामुळे येथे मोठी वर्दळ असते. लॉकडाऊन काळात याभागात मानवी वावर कमी झाला आहे. याचा फायदा येथील निसर्गावर आणि वन्य जीवांवर झाला आहे. अन्नाच्या शोधात वन्य जीव जंगल सोडून शहराकडे येत होते. यामध्ये माकडे आणि बिबट्यासह सापांचा सामावेश होता. हे जीव आता पुन्हा जंगलभागातच रमले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा देखील होत आहे.

नागरिवस्तीत आलेल्या माकडांना मानवांचेच खाद्य खायला मिळायचे. या खाण्याने त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला होता. आता ते पुन्हा जंगलाकडे वळाल्यामुळे त्यांच्या त्वचेवर चांगला बदल पाहायला मिळला आहे. हा बदल शारिरिक दृष्ट्या वन्यजीवांना महत्त्वाचा असतो. बिबट्या आणि इतर प्राणीदेखील या काळात जंगलामध्ये सुखावले आहेत. खासकरुन पावसात प्रत्येक विकेंडला पर्यटक याठिकाणी येतात. मात्र, आता चित्र बदलले आहे. वाहन आणि लोकांची वर्दळ येऊर जंगलात कमी झाल्यामुळे या ठिकाणी येहूर जंगलाच्या पायथ्याशी माकडांचा वावर वाढला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.