ETV Bharat / state

वीस दिवसांत नऊ रुग्ण, कोरोना परत येतोय? ठाणे पालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज - Corona Update Thane

Corona Update Thane: ठाण्यात गुलाबी थंडी पडू लागल्याने सुखावलेल्या ठाणेकरांना परत एक धक्का बसला आहे. (Corona outbreak in Thane) ठाणे महापालिका हद्दीत काही दिवसांपूर्वी कोरोनाचा एक रुग्ण सापडला होता; परंतु मागील २० दिवसात कोरोनाचे ९ नवीन रुग्ण सापडल्याने पालिकेच्या आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे.(Thane Municipal Corporation)

Corona Update Thane
ठाणे पालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 9:33 PM IST

ठाण्यातील कोरोना प्रसाराच्या स्थितीविषयी माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक

ठाणे Corona Update Thane: JN१ हा ओमायक्रोनचा नवा व्हेरियंट आला असून हाच जिवाणू आता सगळ्यांच्या चिंतेचे कारण ठरत आहे. यात आश्चर्याची बाब म्हणजे हा रुग्णांच्या तपासणीचे अहवाल अद्याप पालिकेला प्राप्त न झाल्याने ह्या रुग्णांना नव्या वेरियंटची लागण लागली आहे की नाही, हे समजू शकलेलं नाही. (Health Department Thane) JN१ व्हेरियंटचे रुग्ण मिळू लागल्याने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाने कोरोनाच्या चाचण्या देखील वाढविण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना बाधित मुलगी बिहारची: ठाण्यात सापडलेली कोरोनाबाधित मुलगी ही मूळची बिहारची असून ती पती सोबत खेड येथे आली होती. तेथून ती १५ दिवसांपूर्वी ठाण्यात आली. इथे आल्यावर तिला दमा, ताप आणि सर्दीचा त्रास होऊ लागल्याने तिची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये तिचा अहवाल सकारात्मक आल्याने तिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आले होते. योग्य उपचाराने तिच्या तब्येतीत सुधारणा झाली अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेची जय्यत तयारी: ठाण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ठाणे महानगरपालिकेने शासनाच्या निर्देशानुसार शहरातील आरोग्य केंद्र आणि कळवा रुग्णालयात संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्याचे सुरू केले आहे. याद्वारे दिवसाला २०० चाचण्या करण्यात येत असून त्यातील १२ओ शीघ्र प्रतिजन तर ८० आरटीपीसीआर करण्यात येतात. यात कोरोनाची लक्षणे दिसून आली तर संशयित रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते, असे जिल्हा शल्य चिकित्सकाने सांगितले. या चाचण्या आणखी वाढवण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. कळवा रुग्णालयामध्ये एकूण २० खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्यापैकी पाच खाटा ह्या ऑक्सजन लावलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. डिसेंबर महिन्यात एकूण नऊ रुग्ण तपासणीसाठी आले. त्यातील सात रुग्णांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 2020 मध्ये अवघ्या देशात कोरोनाने थैमान घातला होता. यावेळी ठाणे जिल्ह्यात हजारो कोरोनाबाधित रुग्णांना जीव गमवावा लागला होता. आता तरी अशी परिस्थिती येऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाचे कंबर कसली आहे.

हेही वाचा:

  1. 'प्रामाणिकता जयतु'! एसटी बस कंडक्टरनं प्रवाशाची विसरलेली पाच लाख रुपयांची पिशवी केली परत
  2. पायाखालची वाळू घसरलेल्या आव्हाडांची वक्तव्य कपोल कल्पित- भाजपा
  3. अंगणवाडी सेविका संपामुळे पोषण आहार रखडला, ६० लाख बालकांचे आरोग्य धोक्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.