नवी मुंबई - पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे, पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या संकल्पनेतून, पालिका हद्दीत ६ ठिकाणी 'तापाचे खास हेल्थ सेंटर' सुरु करण्यात आले आहेत. या रुग्णालयात तापासारख्या आजारावर आठवड्यातील सहा दिवस उपचार केले जाणार आहे. या नवीन संकल्पमुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर आळा घालता येईल, असा विश्वास आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यभर विविध उपाययोजना केल्या जात आहे. पनवेल महानगरपालिकेनेही पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल या ठिकाणी सर्दी, ताप, खोकला यांची तपासणी केंद्रे उघडली आहेत. नागरिकांनी गर्दी न करता सर्दी, ताप, खोकला या आजाराचे लक्षणे जर दिसून आली तर या तपासणी केंद्रात जाऊन आपली चाचणी करण्याचे आवाहन, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
हेही वाचा - लॉकडाऊन इफेक्ट : रामकृष्ण मिशनच्या स्वयंसेवकांनी दिला आदिवसी कुटुंबियांच्या पोटाला आधार
हेही वाचा - शॉर्टसर्किटमुळे प्लास्टिक कारखान्याला भीषण आग, कारखान्यासह ३ गोदामे जळून खाक