ETV Bharat / state

मुरबाडमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; शहर ३ दिवस बंद - ठाणे

सदर मुलाच्या कुटुंबाची वैद्यकीय विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. तर कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने मुरबाड शहर ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

corona positive youth found in murbad city lockdowned for 3 days
मुरबाडमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; शहर ३ दिवस बंद
author img

By

Published : Apr 1, 2020, 4:36 PM IST

ठाणे - अमेरिकेतून चार मित्रांसह १५ दिवसांपूर्वी आलेल्या मुरबाडमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. होम क्वारंटाईन असलेल्या या तरुणावर रोज औषधोपचारासह त्याची तपासणी होत होती. त्यातच या तरुणाची १२व्या दिवशी तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत अमेरिकेहून आलेल्या मित्रापैकी एक मित्रही पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तो पुण्यात राहत असून त्याच्यावर पुणे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर मुरबाडमधील या तरुणाला मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुरबाडमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; शहर ३ दिवस बंद

सदर मुलाच्या कुटुंबाची वैद्यकीय विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. तर कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने मुरबाड शहर ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ज्या परिसरात हा तरुण राहत होता तो परिसर ३ किमीपर्यंत सील करण्यात आला आहे, तर मुरबाड तालुक्याशेजारी असलेल्या शहापूरमध्ये सुमारे ३८ संशयित रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे मुरबाड आणि शहापूरकरांनी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर निघू नका, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.