नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाचा कहर वाढत असून, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी नवी मुंबईत 82 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत रविवारी झालेली वाढ सर्वाधिक आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्यामुळेनवी मुंबई महानगरपालिका प्रशसनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत 685 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते . आत्तापर्यंत नवी मुंबईत 6620 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 4386 जण निगेटीव्ह आले असून, 1871 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे. नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 674 इतकी आहे.
रविवारी 354 जणांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले होते त्यापैकी 272 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून, 82 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भे 20 मधील , कोपरखैरणे मधील 14 , नेरुळ मधील 7, वाशीतील 21, घणसोली मधील 5 ऐरोली मधील 8व दिघ्यात 4,बेलापूर मधील 3 असे एकूण 84 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.शहरात 674 इतकी कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा झाला आहे.आतापर्यंत शहरात कोरोनामुळे 14 जणांचे मृत्यू झाले आहेत. रविवारी एकूण 80 जण कोरोनामुक्त झाले तर एकूण 155 जण आत्तापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नवी मुंबईत 91 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.