ETV Bharat / state

कोरोनामुळे आर्थिक मंदीचा दिवाळीच्या तयार फराळविक्रीवर परिणाम - readymade faral

कल्याण-डोंबिवलीत दसरा संपला की, परदेशात फराळ पाठवण्याची लगबग सुरू होते. मात्र, यंदा त्यालाही कोरोनामुळे फटका बसला आहे. एकूणच बाजारात उलाढाल खूप कमी झाली आहे.

corona affects on ready-made faral
फराळ
author img

By

Published : Nov 8, 2020, 3:37 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवलीत पुरण-पोळी, उकडीचे मोदक या पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर खप असतो. घटस्थापनेपासून दिवाळीपर्यंतचा काळ सर्वाधिक खरेदीचा असतो. मात्र, सध्या कोरोनामुळे आर्थिक मंदीचा फटका घरगुती तयार फराळाला देखील बसला आहे. त्यामुळे दिवाळीच्या तयार फराळाच्या विक्रीत जवळपास 40 ते 50 टक्के घट होण्याची भीती विक्रेते व्यक्त करीत आहेत.

देश-परदेशातून फराळाच्या मागणीला प्रतिसाद नाही
कल्याण-डोंबिवलीत दसरा संपला की, परदेशात फराळ पाठवण्याची लगबग सुरू होते. मात्र, यंदा त्यालाही कोरोनामुळे फटका बसला आहे. एकूणच बाजारात उलाढाल खूप कमी झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजी-पोळी विक्री करणारी जवळपास 350 केंद्रे आहेत. याठिकाणी घरगुती पद्धतीचा दिवाळी फराळ मोठ्या प्रमाणात विकला जातो. गेल्या दिवाळीत फराळ जगभरातील विविध प्रमुख शहरात पाठवण्याची सोय करण्यात आली होती, असे सुरस फुड्सचे सुनील शेवडे सांगतात. तर कुलकर्णी ब्रदर्सचे श्रीपाद कुलकर्णी यांनीही गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी अमेरिका, लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, कतार अशा 176 देशात घरगुती पद्धतीचा तयार फराळ पाठवला होता. मात्र, सध्याची बाजाराची अवस्था लक्षात घेऊन विक्रेत्यांनी 30 ते 35 टक्के माल खरेदीत कपात केली आहे.

मिठाई, चॉकलेट, ड्रायफ्रूट पदार्थांचा पर्याय
नवरात्रीपर्यंत फराळाच्या ऑर्डर यायला लागलेल्या असतात. ऑर्डरनुसार तेल, इतर किराणा सामानाची खरेदी केली जाते. यावर्षी मात्र कोरोनामुळे घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे गेले ६ महिने सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे तयार फराळाला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. पूर्वी दिवाळीचा फराळ हा सण संपल्यानंतरही आवडीने खाल्ला जायचा. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. लोकांची चव बदलली आहे. त्यामुळे मिठाई, चॉकलेट, ड्रायफ्रुट अशा इतर पदार्थांचाही पर्याय पुढे आला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात होणारा फराळाचा खप यंदा मंदावला आहे. फिटनेसचे कारण देत अनेक जण तेलकट, तुपकट पदार्थ, लाडू खात नाहीत.

महिला बचत गटांनाही मंदीचा फटका -
दिवाळी तोंडावर आली की, घरोघरी साफसफाई, खरेदी अशी लगबग सुरू होते. यात दिवाळीच्या फराळाचे मानाचे पान असते. घर आणि करिअर अशा दोन्ही आघाड्यांवर लढणाऱ्या अनेक महिलांना फराळ करण्याचा खटाटोप करता येत नाही. महिला बचत गट हे सामाजिक आर्थिक उपक्रम आहेत. महाराष्ट्रात बचत गटांच्या माध्यमातून महिला आणि छोटे व्यवसाय यांची एक चळवळच उभी राहिली.

कपडे, गोधड्या, घरगुती लोणची-पापड विक्री, ऑफिस फाईल्स, उदबत्त्या, आदी अनेक प्रकारचे उद्योग महिला बचत गटांच्या माध्यमातून केले जातात. सणासुदीच्या दिवसांमध्ये नोकरदार स्त्रियांना मदतीचा हात देण्यासाठी दिवाळीच्या पदार्थांच्या ऑर्डरही महिला बचत गट घेतात. पण यंदा मात्र दिवाळीसह वर्षभरातील सर्वच सण कोरोना काळात आल्याने फराळाला महागाई आणि बाजारातील मंदीमुळे मोठ्या प्रमाणात मागणी नसल्याचे चित्र आहे. तीन वर्षांपूर्वी दुकानांतल्या रेडिमेड फराळावर 12 टक्के जीएसटी आकारला जात होता. त्यामुळे किमती प्रतिकिलो 40 रुपयांनी वाढल्या होत्या. बचत गटांच्या माध्यमातून तयार झालेल्या पदार्थांवर हा करभार नसल्याने या पदार्थांना मागणी अधिक होती. यावर्षी मात्र महिला बचत गटांना मिळणाऱ्या ऑर्डरचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.