ठाणे : कोपरी पूल येथे टाकण्यात येणाऱ्या गर्डर मुळे आज ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आलेली आहे रात्रीच्या सुमारास हे गर्डर टाकण्यात आले .या विशेष मोहिमेसाठी अनेक दिवसांपासून तयारी करण्यात आली होती मुंबई ठाण्याला जोडणारा हा पुल राष्ट्रीय महामार्गावर आहे शिवाय या पुलाखालून मद्यरेल्वेची वाहतूक अहोरात्र सुरू असते. इतका महत्वाचा असलेला हा पुल बांधण्यासाठी रेल्वे ,एमएमआरडीए ,महापालिका राज्य सरकार पोलीस दल यांचा समन्वय आवश्यक होता या पुलाचे अर्धे बांधकाम पूर्ण झाले असून अर्धे बांधकाम शिल्लक होते त्यामुळे आताचे हे काम शेवटच्या टप्प्यातले काम होते आणि त्यासाठी वेळही लागणार होता पोलिसांनी केलेले योग्य नियोजन आम्ही रेल्वेने केलेल्या सहकार्यामुळे हे गर्डर टाकणे शक्य झाले.
कर्नाक ब्रिज पाडण्याचे काम सुरू अहोरात्र पोलीस आणि वाहतूक पोलीस कार्यरतठाण्यातील वेगवेगळ्या पॉईंटवर बंदोबस्त व इंस्ट्रक्शन देखील देण्यात येणार आहे नाशिकच्या दिशेने येणारे मुंब्रा बायपास वरून वाहतूक वाढवण्यात येत आहे तसेच मुंबईच्या दिशेने येणारे वाहतूक एलबीएस तसेच ऐरोली मार्गे वळण्यात आली आहे.सात तासाचा ड्रायव्हरजन असून या कामासाठी ठाण्यातून 200 पोलीस कर्मचारी तसेच 40 अधिकारी कामकाजासाठी नेमलेली आहेत .एकूण सात गडर या ठिकाणी लागणार आहेत. तर त्यातील तीन आज रात्री व चार गर्डर उद्या रात्री लागणार आहेत त्यासाठी आज जे ट्राफिक ची व्यवस्था आहे तीच व्यवस्था उद्या देखील असणार आहे.नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जर अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा व जे दिले ड्रायव्हरच्या आहेत त्याचे पालन करा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोपरी ब्रिज हा खूप अरुंद रस्ता होता व या ठिकाणी होणारे वाहतूक आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होते परंतु या रस्त्याचं रुंदीकरण होत असल्यामुळे या ठिकाणाहून दुप्पट क्षमताने वाहतूक करण्यास मदत होईल असा आत्मविश्वास प्रशासनाला आहे.ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी नाशिक मुंबई महामार्गाने कोपरी पुलावारून मुंबईच्या दिशेने चाहतूक १) करणाया वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.पर्यायी मार्ग ही वाहने खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौक- पारसिक रेती बदर, मुबा बाह्यवळण, शिळफाटा, महापे मार्गे रबाळे - ऐरोली, मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील. घोडबंदर मार्गाने कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना माजिवाडा पुलावरून उजवे वळण घेण्यास व माजिवडा पुलाखाली प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग - ही वाहने तत्वज्ञान सिग्नल पुढे माजिवाडा पुलावरून खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेवून गॅमन चौक, पारसिक रेती बदर, मुब्रा बाह्यवळण, शिळफाटा, महापे मार्गे रबाळे ऐरोली, मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांसाठी नाशिक तसेच घोडबंदर मार्गाने आणि ठाणे शहरातून पूर्व द्रुतगतीमार्गे मुबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांना तीनहात नाका पूल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग शहरातील वाहने टपाल कार्यालय, ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह मार्ग, कळवा-विटावा- ऐरोली मार्गे पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.पर्यायी माग - घोडबंदर मार्गे आणि ठाणे शहरातून मुबईच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने तीन हाते नाका येथून उजवीकडे वळण घेऊन एल. बी. एस. मार्गे, मॉडेला चेक नाका येथून इच्छित स्थळी जातील.
हे पर्यायी मार्ग घोडबंदर मार्गे आणि ठाणे शहरातून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने तीन हात नाका, तुळजा भवानी मंदिर सेवा रस्ता, बारा बंगला, बाल निकेतन शाळा, आनंदनगर चेक नाका मार्गे मुंबईत जातील.मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना कोपरी पुलावरून प्रवेशबंदी करण्यात आली होती.