ETV Bharat / state

Sanjay Raut Supari Allegation : ठाण्यात शिजली संजय राऊतांच्या हत्येची खिचडी! वाचा संपूर्ण प्रकरण - MP Sanjay Raut

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्याची सुपारी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी ठाण्यच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहले आहे.

Sanjay Raut Supari Allegation
Sanjay Raut letter
author img

By

Published : Feb 21, 2023, 8:53 PM IST

Updated : Feb 21, 2023, 10:28 PM IST

ठाण्यात शिजली संजय राऊतांच्या हत्येची खिचडी

ठाणे : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यापासून राजकीय खलबत वाढले आहेत. त्यामुळे ठाण्यात गुन्हेगारी कारवायांत सुद्धा वाढ झालेली पहायला मिळते आहे. पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत केलेले आरोप, तसेच वादग्रस्त क्लिप त्यानंतर सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर जीवघेणा हल्ला असे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे.

  • Sanjay Raut, Uddhav Thackeray faction's leader, in a letter to Maharashtra Dy CM, Mumbai CP & Thane CP said, "I have received information that a notorious goon Raja Thakur of Thane has been given a contract by Shrikant Shinde to kill me."

    (file pic) pic.twitter.com/MNOHf9ocP5

    — ANI (@ANI) February 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

खासदार श्रीकांत शिंदेवर गंभीर आरोप : उद्धव ठाकरे शिवसेसेनेचे खासदार, सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदेवर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी जीवे मारण्यासाठी ठाण्यातील गुंडाला सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्याच्या या आरोपाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामुळे ठाण्यात येणाऱ्या काळात कायदा, सुव्यवस्था धोक्यात येणार कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाण्यात राजकीय वातावरण गढूळ : ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग याना मंगळवारी उद्धव ठाकरे सेनेचे खासदार, सामना दैनिकांचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लेखी पत्र दिले आहे. ठाण्यातील कायदा, सुव्यवस्था किती सुरक्षित आहे? असा प्रश्न निर्माण केला आहे. ठाण्यातील परिस्थिती धोकादायक आहे याची जाणीव राऊत यांनी करुन दिली आहे. त्यामुळे ठाण्यात राजकीय वातावरण पूर्वीपासूनच गढूळ झालेले असून याचेच पडसाद अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणावर पडत आहेत.

काय लिहले आहे पत्रात ? उद्धव ठाकरे शिवसेनेचेखासदार संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग याना दिलेले लेखी पत्रांने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेली आहे. खासदार संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्ताना लिहलेल्या पत्रात खात्रीलायक माहिती दिली. कि, राऊत यांच्या हत्येचा कट, सुपारीची खलबते ठाण्यात घडल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. सरदचा आरोप फार जबाबदारीने करीत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात लिहले आहे.

कोण हा राजा ठाकूर ? राजा ठाकूर याची ठाण्यातील गँगस्टर म्हणून ओळख आहे. त्याच्या विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी सारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद असलायची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर २०११ साली ऐरोली साईनाथ वाडीमधील दीपक पाटील याची भर रस्त्यात अडवून हत्या करण्यात आली होती. या गोळीबार प्रकरणात राजा ठाकूर याचा समावेश होता. या प्रकरणी राजा ठाकूरसह आठ जणांचा समावेश होता. २०१० पासून ते आजपर्यंत अशी फिल्मी स्टाईलने हत्या झालेली नाही. न्यायालयाने या आरोपीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे. मात्र, आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

धांदात खोटे आरोप : यावर शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या बाबत बदनामीची तक्रार करणार असल्याचा आरोप त्यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. त्यांना हत्या होणार असल्याचे स्वप्नात दिसले काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे कोणाचीही हत्या करायला रिकामे बसलेत काय? कुणाबद्दल काहीही बोलता, कुणालाही तुम्ही गुंड म्हणता, तुम्हाला कुणी अधिकार दिले. बोलायला भेटत नाही म्हणून काहीही बोलता काय? अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राऊत बंधू मांडवली बादशहा : संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. केवळ सहानभूती लाटण्यासाठी अशा प्रकारचे खटाटोप राऊत करीत असतात. गुन्हेगारी विश्वात संजय राऊत, त्यांचे बंधू हे गुंडांच्या मांडवली करतात. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेले आहेत. त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना( शिंदे गट ) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.

हेही वाचा - Harshvardhan Jadhav News : कन्नड येथे जाधव पती - पत्नीत राजकीय ड्रामा, चर्चेला आले उधाण, वाचा काय आहे प्रकरण

Last Updated : Feb 21, 2023, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.