नवी मुंबई - मोदी सरकारच्या कालावधीत दिवसागणिक होणाऱ्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नेरूळ तालुका ब्लॉक काँग्रेसच्यावतीने नेरूळ सेक्टर 6 मधील पेट्रोलपंपावर अभिनव पद्धतीने ‘लॉलीपॉप’ आंदोलन करण्यात आले.
इंधन दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारचा करण्यात आला निषेध:
पामबीच मार्गालगत असलेल्या नेरूळ सेक्टर 6 मधील पेट्रोलपंपावर सोमवारी सकाळी नेरूळ तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले. पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या चालकांना यावेळी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्याकडून ‘लॉलीपॉप’ चॉकलेट देण्यात आले.
केंद्र सरकारच्या निषेधार्थ देण्यात आल्या अच्छे दिनाच्या घोषणा:
संबंधित लॉली पॉप आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारकडून सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‘अच्छे दिन’च्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी आंदोलनात काँग्रेसचे नेते संतोष शेट्टी, काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, तालुका उपाध्यक्ष दिनेश गवळी, शेवंता मोरे, प्रभाग 85 चे काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष किशोर तांबे, ताळेकर, माने सहभागी झाले होते.
हेही वाचा - मराठा आरक्षण मुद्यावर मुख्यमंत्री घेणार पंतप्रधानांची उद्या भेट