ETV Bharat / state

दक्षिण आफ्रिकेतून औषध आणून देण्याच्या नावाखाली रुग्णाला दिली पिठी साखर

दक्षिण आफ्रिकेतून औषध आणून देण्याच्या नावाखाली एका रुग्णाला डॉक्टराने कोणतेही नाव नसलेले चक्क पिठी साखर आणि स्पिरिट सदृश्य द्रव पदार्थ दिल्याचा आरोप रुग्णाने केला आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील वांगणी जवळील भोई सावरे गावात घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे डॉक्टराने औषधासाठी रुग्णाला साधी पावती देऊन, ३६ हजार हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

author img

By

Published : Mar 6, 2021, 4:35 AM IST

रुग्णाची फसवणूक, डॉक्टरविरोधात तक्रार
रुग्णाची फसवणूक, डॉक्टरविरोधात तक्रार

ठाणे - दक्षिण आफ्रिकेतून औषध आणून देण्याच्या नावाखाली एका रुग्णाला डॉक्टराने कोणतेही नाव नसलेले चक्क पिठी साखर आणि स्पिरिट सदृश्य द्रव पदार्थ दिल्याचा आरोप रुग्णाने केला आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील वांगणी जवळील भोई सावरे गावात घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे डॉक्टराने औषधासाठी रुग्णाला साधी पावती देऊन, ३६ हजार हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रुग्णाने बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात व ठाणे पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

अंबरनाथ तालुक्यात वांगणी जवळील भोई सावरे या गावात राहणारे जनार्दन भोईर हो किडनीच्या विकाराने त्रस्त आहेत. याचदरम्यान २६ फेब्रुवारी रोजी त्यांनी वांगणीमधील शिला क्लिनिकमध्ये आपल्या आजारावर उपचार सुरू केले. डॉक्टर यु.एस.गुप्ता हे भोईर यांच्यावर उपचार करत होते, दरम्यान मी तुमच्यासाठी दक्षिण अफ्रिकेमधून औषध मागवतो, असे सांगत या डॉक्टराने आपल्याला स्पिरिट आणि सॅनिटायझर सदृश्य द्रव आणि पिठी साखर दिल्याचा आरोप जनार्दन भोईर यांनी केला आहे. तसेच ते पादार्थ खाल्ल्याने मला त्रास देखील झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रुग्णाची फसवणूक, डॉक्टरविरोधात तक्रार

डॉक्टरविरोधात तक्रार

दरम्यान डॉक्टरांनी या औषधासाठी माझ्याकडून 36 हजार रुपये घेतले असून, आपली फसवणूक झाल्याचे भोईर यांनी सांगितले आहे. त्यांनी याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाणे तसेच ठाणे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण डॉक्टर गुप्ता यांनी दिले आहे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक औषधावर त्या औषधामध्ये कोणकोणते घटक आहेत, ते औषध किती प्रमाणात घ्यायचे, त्याची किमंत काय आहे? या सर्व गोष्टींचा उल्लेख असतो, जर तसा उल्लेख नसेल तर त्यामुळे रुग्णाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे असं मत अंबरनाथ मधील काही डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.