ETV Bharat / state

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 4 कलमी कार्यक्रमाची आयुक्तांकडून घोषणा

भिवंडी पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी आज (बुधुवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 4 कलमी उपाययोजनांची घोषणा केली. त्याची प्रभावी अंमलबजावणी करून येत्या 10 दिवसात येथील परिस्थितीत आमूलार्ग बदल घडवून आणण्याचा विश्वस व्यक्त केला.

Commissioner announces 4-point program to break corona chain in bhiwandi
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 4 कलमी कार्यक्रमाची आयुक्तांकडून घोषणा
author img

By

Published : Jun 24, 2020, 7:00 PM IST

Updated : Jun 24, 2020, 10:21 PM IST

ठाणे - अनलॉक कालावधीत भिवंडी शहरातील रुग्ण वाढीचा वेग वाढत असतानाच मृत्यू दरसुध्दा वाढल्याने शहरवासियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशात परिस्थिती हाताळण्यासाठी महानगरपालिका आयुक्त म्हणून मालेगाव येथे कोरोना विरोधात प्रभावी काम करून तेथील रुग्ण आटोक्यात आणण्यात यशस्वी झालेले डॉ. पंकज आशिया यांची भिवंडी पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर तीन दिवस येथील कामकाजाचा प्रशासनाकडून राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी आज (बुधुवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत 4 कलमी उपाययोजनांची घोषणा केली. त्याची प्रभावी अंमलबजावणी करून येत्या 10 दिवसात येथील परिस्थितीत आमूलार्ग बदल घडवून आणण्याचा विश्वस व्यक्त केला. याेवेळी उपायुक्त नूतन खाडे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.

शहरात कोरोना दुपट्टीचा वेग कमी असून, त्यासाठी सर्वप्रथम रुग्णालय व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. आयजीएम रुग्णालयावर अधिक भर असल्याने शहरातील जे रुग्णालय अधिग्रहित केले आहेत, त्याशिवाय इतर रुग्णालय व्यवस्थापनासोबत चर्चा करून अधिक बेड कसे उपलब्ध होतील हे पाहणे गरजेचे आहे. जे रुग्ण आढळून येत आहेत त्यांच्या अति निकट संपर्कात व जवळील व्यक्तींची वेळीच तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करणे यावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी रुग्णांनाही आपला आजार लपवून न ठेवता त्याची वेळीच माहिती दिल्यास उपचार करणे सहज शक्य असून, त्यासाठी शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 4 कलमी कार्यक्रमाची आयुक्तांकडून घोषणा

नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी शहरातील मशिदीचे मौलवी मौलाना यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची मदत घेण्यात येणार असल्याचेही आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी स्पष्ट केले. तपासणीची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच दररोज १५० तपासणी करण्याचा मनोदय असून, शहरातील कंटेनमेंट क्षेत्रातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांचे पथक करून त्यावर लक्ष केंद्रित करून कामास लवकरच सुरूवात होणार असल्याने या उपाय योजनांची योग्य अंमलबजावणीसाठी महानगरपालिका कर्मचारी, नागरिक, शहरातील स्वयंसेवी संस्था या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. या माध्यमातून येत्या 10 दिवसात येथील परिस्थिती नक्कीच आटोक्यात आणण्यात यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोना विरोधातील या लढ्यात प्रशासन व नागरीक यांच्यातील विश्वासाचे नाते गरजेचे आहे. शहरात आरोग्य सेवेतील कर्मचारी कमी असताना ते काम करीत आहेत. त्यांच्यासोबतीने अधिक डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत, यासाठी आमचा प्रयत्न असून त्यासाठी शहरातील विविध डॉक्टर्स संघटना प्रतिनिधींसोबत बैठका सुरु आहेत. शहरातील निर्जंतुकीकरण करणे, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. या लढ्यात सर्वांच्या साथीने मुकाबला करता येणे शक्य असल्याचा विश्वास आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी व्यक्त केला.

Last Updated : Jun 24, 2020, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.