ठाणे : इतिहासात प्रथमच जिल्ह्याचे नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर ठाणेकर जनतेच्या मनात शहराबद्धल अपेक्षा वाढल्या आहेत. देवसेंदिवस शहरात वाढणारी लोकसंख्या, नागरिकीकरण, स्वच्छाता, विविध प्रकल्प, शहर सौदरिकीकरण याच बरोबर खड्डेमुक्त ठाणे, ठाणे डेब्रिजमुक्त व स्वच्छ आरोग्यदायी जीवन आणि नागरिकांना रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी यासारख्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत 'मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे' या अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात (CMs Thane Changing Campaign ) आला. येत्या ६ महिन्यात ठाणे बदल दिसणार असून सर्वाना हे ठाणे आपलेसे वाटावे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना यावेळी दिली.
ठाण्याच्या चेहरा मोहरा बदलणार : ठाण्याचा चेहरा मोहरा बदललेला दिसणार असून शनिवारी ठाणे पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे ध्वनीचित्रफीतिचा शुभारंभ करण्यात ( Face Of Thane Will Change ) आला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर,माजी महापौर नरेश म्हस्के,मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम,जेष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर,भाजप माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर,नारायण पवार यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, पालिका अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुखमत्र्यांसह उपस्थितांना आयुक्तांनी पुस्तकांचा बुके भेट देण्यात आला. यावेळी शिंदे यांनी अनेक विषयाला हात घालत आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. ठाण्याच्या विकासाच्या कामाचा शुभारंभ होत असताना माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. या ठाण्याने मला मुख्यमंत्री पदाची संधी दिली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
ठाणेकरांनी आता ठाणे सांभाळायचे : मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रचंड व्याप मागे आहे. ठाण्याने मला सर्व काही दिले. शाखाप्रमुख ते नगरसेवक, सभागृह नेते, आमदार नंतर मंत्री आता मुख्यमंत्री त्यामुळे मला आता महाराष्ट्र सांभाळायचा असून ठाण्यातील लोकांनी ठाणे सांभाळायचे आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यायचा आहे. त्याचसाठी मला काम करायचे असून मला ठाण्याची चिंता वाटत नाही. ठाणेकर सुज्ञ आहेत. बाळासाहेबांचे विशेष प्रेम होते. असे म्हणत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेच्या आठवणी शिंदे यांनी जागवल्या.
ठाण्यात आल्यानंतर शांत झोप : ठाणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ठाण्याचा मला अभिमान असून हे शहर आपले आहे, सर्वांचे आहे. सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आणि नंतर रात्री उशिरा ठाण्यात आलो. तरी मला समाधान वाटत ठाण्याच्या घरी आल्यानंतर मला शांत झोप ( Well Sleep At Thane Home ) लागत असल्याची कबुली शिंदे यांनी यावेळी दिली.
माझ्यावर आरोप करण्याची स्पर्धा : राज्याबाहेर उद्योग जात असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र हे उद्योग एक दोन महिन्यात जातात का ? असा सवाल शिंदे यांनी विरोधकांना विचारला. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्याची स्पर्धा सुरु झाली असून मला कामाने उत्तर दयायचे आहे. मी रात्रभर काम करत असतो त्यामुळे काही लोकांना चिंता लागली आहे. मी जिकडे जातो तिकडे लोकांचा प्रतिसाद मिळत असतो हि भावना लोकांच्या दिसून येते असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मी धाडसी असल्याने मुख्यमंत्री : सुरूवातीला मुख्यमंत्री कोण होईल अशी चिंता होती. परंतु मी मोदींना आणि अमित शाह यांना एक जोरदार तसेच धाडसी माणूस वाटलो असावा त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली असल्याचे शिंदे म्हणाले. दरम्यान कॅबिनेट मध्ये आम्ही जोरदार निर्णय घेत जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचे काम आम्ही करत आहोत.
मुख्यमंत्राचे स्वप्नातले ठाणे करून दाखवणार : मला ठाणे पालिकेचे आयुक्त म्हणूण जबाबदारी ( Thane Of Dream ) मिळाली. त्यानंतर पहिलीच ठाण मनपाला भेट देत तेव्हा अभियान करायचे ठरले. दैनंदीन जीवनाशी निगडीत अडचणी सोडवण्यासाठी काय करता येतील याचा आढाव घेतला. स्वच्छतेबाबत मुख्यमंत्र्यांच्या काही अपेक्षा असून खड्डेमुक्त रस्ते, शहराविषयी अभिमान वाटावा यासाठी सौदर्यीकरण आम्ही हाती घेतले पाहिजे. येत्या ६ महिन्यात मुख्यमंत्राचे स्वप्नातले ठाणे करून दाखवणार असे आश्वासन ठाणे पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी यावेळी दिली.