ठाणे - कल्याणच्या बहूचर्चित पत्रीपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (दि. 25 जाने.) करण्यात आले. विशेष म्हणजे व्यासपीठावरच पुलाचे नामकरण माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव भाजपच्या आमदार, खासदारांनी पुढे करून वाद उकरून काढत शिवसेनेला कोंडीत पडकण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलाचे नाव ‘आई तिसाई गावदेवी’ पूलच राहणार असल्याचे शिवसेनेच्या खासदारसह पालकमंत्री आणि लोकार्पणवेळी मुख्यमंत्र्यानीही जाहीर करत भाजपवर टोमणेबाजी करून बोचरी टीका केल्याचे पाहवयास मिळाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुलाचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने केल्यानंतर भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार कपिल पाटील यांनी पुलाच्या नामकरणरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री ठाकरेंनीही नामकरणाच्या वादात न पडता चांगल्या कामासाठी विरोधकांनी जेवढे जमेल तेवढे सहकार्य करायला पाहिजे. शिवाय प्रत्येकाला निवडणुकीत मोठी संधी असतेच त्यामुळे सर्वच पक्षांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून सहकार्याची भूमिका घेऊन विकासकामांसाठी सहकार्य करा, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर शेरेबाजी करीत सल्ला दिला आहे.
अडथळ्यांची शर्यत करायची मग आपली गती मोजायची
शेवटी त्यांनी केंद्रातील सरकारच्या रखडलेल्या विकासकामांचाही पाडा वाचला मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ज्याप्रकारे आम्ही पत्रीपुलासह अनेक विकासकामात आम्ही तत्परता दाखवली. मात्र, केंद्राच्या अनेक संस्थांकडे राज्याची अनेक विकासकामे अडकून पडली आहे. त्यामुळे अडथळ्यांची शर्यत करायची आणि मग आपली गती मोजायची, असा टोला भाजपला लगावला. विकासकामांचे अडथळे केंद्र राज्य सरकारने मिळून दूर केले पाहिजे, मग ती कांजूरची जमीन असो व कोणत्याही विकासाचा मुद्दा असो. खालच्या पातळीवर तू-तू मै-मै होता कामा नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यानी व्यक्त करत भाजपवर तोंडसुख घेतले.
हेही वाचा - मीरा भाईंदर : चोरीच्या प्रकरणातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार; शोध सुरू