ETV Bharat / state

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री अयोध्येला जाणार! महंतांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट - मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगजेबाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली (Ajit Pawar over statment on Aurangzeb) आहे. सोमवारी अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रूघ्न दास आणि छबिराम दास महाराज यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट (CM Eknath Shinde Criticized Ajit Pawar) घेतली. त्यावेळी ते बोलत होते. तसेच त्यांनी लवकरच पक्षाचे प्रमुख नेते अयोध्येला जाऊन सर्व पाहणी करतील, असेही (CM Eknath Shinde meet Mahant of Ayodhya) सांगितले.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jan 3, 2023, 7:45 AM IST

Updated : Jan 3, 2023, 5:34 PM IST

प्रतिक्रिया देताना महंत व मुख्यमंत्री

ठाणे : अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रूघन दास आणि छबिराम दास महाराज यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांची सदिच्छा भेट (Criticized Opposition Leader Ajit Pawar) घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्यासाठी निमंत्रित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जात राज्यात सत्तांतर घडवून आणले असून त्यांना प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद असल्यानेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला यायला हवे, अशी इच्छा या भेटीत महंतांनी व्यक्त (Ajit Pawar over statment on Aurangzeb) केली.

अयोध्येला जाणार : महंतांचे आपल्या निवासस्थानी उचित स्वागत करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, तसेच त्यांच्या विनंतीला मान देऊन अयोध्येला येण्याचे देखील कबूल केले. यावेळी त्यांनी निश्चित तारीख सांगितली नसली तरीही लवकरच पक्षाचे प्रमुख नेते अयोध्येला जाऊन सर्व पाहणी करतील. त्यानंतर सर्वजण अयोध्येला येतील, असे महंत शशिकांत दास महाराज यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. या भेटीवेळी खासदार राहुल शेवाळे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव भाऊ चौधरी आणि नाशिकचे नगरसेवक अजय बोरस्ते हेदेखील उपस्थित (CM Eknath Shinde) होते.

अजित पवारांचे वक्तव्य : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्य रक्षकच होते असे, अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणाले होते. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची कारकीर्द पहिली तर मोघलांच्या विरोधात औरंगजेबच्या विरोधात लढण्यात त्यांचा खूप वेळ गेला. या देशाचे आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी प्राणाची आहुती दिली. हा इतिहास संपूर्ण भारताला माहीत आहे.

Last Updated : Jan 3, 2023, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.