ठाणे - एका निर्दयी अज्ञात मातेने आपल्या नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत बांधून नाल्यात फेकल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर नजीक असलेल्या शहाड फाटक परिसरातील एका नाल्याजवळ घडली. खळबळजनक बाब म्हणजे अनैतिक संबंधातून हे मुल जन्माला आल्याने मातृत्व लपवण्यासाठी अर्भक फेकले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
हेही वाचा - कल्याणच्या शिल्पकाराची किमया; पराक्रमाच्या आठवणीतील शिल्प सातासमुद्रापार
प्लास्टिकच्या पिशवीत फेकण्यात आलेले हे पुरुष जातीचे अर्भक जीवंत आहे. आज सकाळच्या सुमारास रिक्षात आलेल्या एका अज्ञात मातेने हे अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत गुंढाळून उल्हासनगर नजीक शहाड फाटक परिसरात एका नाल्याच्या शेजारी फेकून ती पसार झाल्याचे एका व्यक्तीला दिसले. त्या व्यक्तीला प्लास्टिकच्या पिशवीत काही तरी हालचाल सूर असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या अर्भकाला मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अर्भकाची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा - सिडको प्रशासनावर नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा रोष
अनैतिक संबंध लपवण्याचा हेतूने अर्भक फेकले असावे असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी निर्दयी अज्ञात मातेवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती ज्या रिक्षातून आली त्या चालकाचा शोध लागल्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.