ETV Bharat / state

अचानक वाढलेल्या दुर्गंधीमुळे डोंबिवलीतील नागरिक हैराण; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मात्र कानावर हात - डोंबिवली हवा प्रदूषण

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मागील पंधरा दिवसांपासून रोज सकाळी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो

दुर्गंधीमुळे डोंबिवलीतील नागरिक हैराण
दुर्गंधीमुळे डोंबिवलीतील नागरिक हैराण
author img

By

Published : Dec 12, 2019, 8:29 AM IST

ठाणे - डोंबिवली शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. याबाबत सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रीपासून डोंबिवलीवर प्रदूषणाचे ढग जमा झाले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र, कानावर हात ठेवत महानगरपालिकेकडे बोट दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अचानक वाढलेल्या दुर्गंधीमुळे डोंबिवलीतील नागरिक हैराण

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मागील पंधरा दिवसांपासून रोज सकाळी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देण्यात आली. महानगरपालिकेकडून खाडीत सोडल्या जाणाऱ्या घरगुती सांडपाण्यामुळे थंडीच्या काळात सकाळच्या वेळी दुर्गंधी पसरत असल्याचे मंडळाने म्हटले आहे. मात्र, थंडीमुळे दुर्गंधी वाढत असेल तर मागील दोन वर्षांत इतका त्रास का नव्हता? असा सवाल त्रस्त नागरिकांकडून केला जात आहे.

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 1 परिसरात रासायनिक सांडपाण्याचे चेंबर ओव्हरफ्लो होत असल्याचे समोर आले. या चेंबर्सवर काही पाईप टाकण्यात आले असून त्यातून सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळून आले. हे सांडपाणी चेंबरमधून बाहेर येऊन दुर्गंधी पसरत असल्याचे निष्पन्न झाले. याकडे एमआयडीसी आणि एमपीसीबीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.

बुधवारी पहाटेपासून प्रदुषणाचा प्रचंड त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी वाढल्या. एक प्रकारच्या विशिष्ट वायुमुळे हा त्रास होत असावा. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याचे पश्चिम डोंबिवलीकरांनी सांगितले. आपण सुद्धा अनुभव घेतल्याचे कामा अर्थात कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी सांगितले.

तातडीने उपाययोजना न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा

एमआयडीसीतील वायू प्रदूषणावर एमपीसीबीने (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) तातडीने उपाययोजना न केल्यास मनसेने आपल्या स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिला आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी आणि त्याचे प्रदूषण हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे.
दरम्यान डोंबिवली शहर मनसेने एमपीसीबी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. डोंबिवलीतही एमपीसीबीचे कार्यालय सुरू करण्याची मागणी मनसेने केली आहे. यावेळी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, गटनेते मंदार हळबे, प्रथमेश खरात, वेदप्रकाश पांडे, सचिन कस्तुर, हर्षद राजे-देशमुख, विशाल बडे, शैलेंद्र सज्जे, आदी मनसे पदाधिकाऱ्यांनी निषेध म्हणून तोंडाला मास्क लावला होता.

Intro:kit 319Body:अचानक वाढलेल्या दुर्गंधी डोंबिवलीतील नागरिक हैराण; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मात्र कानावर हात

ठाणे : डोंबिवली शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. एकीकडे याबाबत सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे मंगळवारी रात्रीपासून डोंबिवलीवर जमलेल्या जीवघेण्या प्रदूषणाच्या ढगांमुळे नागरिक हैराण झाले असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवत महापालिकेकडे बोट दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मागील आठ-पंधरा दिवसांपासून रोज सकाळी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवले आहेत. महापालिकेकडून खाडीत सोडल्या जाणाऱ्या घरगुती सांडपाण्यामुळे थंडीच्या काळात सकाळच्या वेळी दुर्गधी पसरत असल्याचे मंडळाने म्हटले आहे. मात्र, थंडीमुळे दुर्गंधी वाढत असेल तर मागील दोन वर्षांत इतका त्रास का नव्हता, असा सवाल त्रस्त नागरिकांकडून केला जात आहे.
एकीकडे मंगळवारी रात्रीपासून गॅस आणि वायूमुळे दुर्गंधी पसरलेली असताना डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 1 परिसरात रासायनिक सांडपाण्याचे चेंबर ओव्हरफ्लो होत असल्याचे समोर आले. या चेंबर्सवर काही पाईप टाकण्यात आले असून त्यातून सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळून आले. हे सांडपाणी सदर चेंबरमधून बाहेर येऊन दुर्गंधी पसरत असल्याचे निष्पन्न झाले. याकडे एमआयडीसी आणि एमपीसीबीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. असाच वास गोग्रासवाडी, गोपाळनगर परिसरात सुध्दा पसरला होता. किसलेला मुळा किंवा चोकअप ड्रेनेजमधून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीसारख्या वासामुळे श्वसनाला त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. विशेष म्हणजे डोंबिवली पश्चिमेस बुधवारी पहाटेपासून प्रदुषणाचा प्रचंड त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी वाढल्या. एक प्रकारच्या विशिष्ट वायुमुळे हा त्रास होत असावा. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याचे पश्चिम डोंबिवलीकरांनी सांगितले. आपण सुद्धा अनुभव घेतल्याचे कामा अर्थात कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी सांगितले. आपण स्वतः पहाटे 5 वाजता फिरायला जात असताना प्रचंड वास येत होता आणि आठ वाजता सुध्दा येत होता माझ्याकडे सुध्दा खुप जणांनी चौकशी केल्याचे ते म्हणाले.

तातडीने उपाययोजना न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा
एमआयडीसीतील वायू प्रदूषणावर एमपीसीबीने (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) तातडीने उपाययोजना न केल्यास मनसेने आपल्या स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिला आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी आणि त्याचे प्रदूषण हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. एमआयडीसीसह पूर्व-पश्चिम-ठाकुर्ली, आदी भागात उग्र दर्प येत होता. त्यामूळे अनेक नागरिकांना श्वास घ्यायलाही त्रास झाला. हा उग्र दर्प नेमका कशामुळे आणि कुठून येत होता याची माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र एमआयडीसी परिसरातील रासायनिक कंपनीतून हा वायू सोडल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. याच दरम्यान डोंबिवली शहर मनसेने एमपीसीबी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. डोंबिवलीतही एमपीसीबीचे कार्यालय सुरू करण्याची मागणी मनसेने केली आहे. तसेच लवकरात लवकर हा वायू प्रदूषणाचा मुद्दा सोडवावा अन्यथा आमच्या स्टाईलने आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, गटनेते मंदार हळबे, प्रथमेश खरात, वेदप्रकाश पांडे, सचिन कस्तुर, हर्षद राजे-देशमुख, विशाल बडे, शैलेंद्र सज्जे, आदी मनसे पदाधिकाऱ्यांनी निषेध म्हणून तोंडाला मास्क लावला होता.

गेल्या दोन दिवसांपासून डोंबिवलीच्या बहुसंख्य परिसरात रासायनिक दर्पयुक्त वासाने नागरिक हैराण झाले होते. पण गेल्या 25 वर्षांपासून एमआयडीसी व लगतचा परिसराला हे नवीन नाही. असा वास आला की एमपीसीबी/एमआयडीसीकडे तक्रार करायची व प्रसारमाध्यमांतून त्या बातम्या यायचा. हिरवा पाऊस, प्रोबेस स्फोट, इत्यादी सारख्या घटना घडल्या की थोड्याबहुत दिखाऊ कारवाई कारवाई दाखवायची. आता याच प्रदूषणाची व्याप्ती अगदी डोंबिवली पश्चिमेला खाडीपर्यंत गेली असल्याने तसेच ठाकुर्ली 90 फिट रोडपर्यंत तसेच सकाळी रेल्वे प्रवाशांना डोंबिवलीतुन प्रवास करताना येत आहे. सुस्त प्रशासन यंत्रणा व त्यांच्यावर कोणाचेच वचक नसल्याने ते कोणालाच दाद देत नाहीत. शांतताप्रिय डोंबिवलीकरांना अनेक प्रकारचा समस्या भेडसावत आहेत. पण तेही मूग गिळून बसले आहेत. स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक फक्त पत्रव्यवहार करतात. मूळ या समस्येच्या खोलात जाऊन येथील प्रदूषणकारी कंपन्यांवर कार्यवाही करण्यास कुणीही धजावत नाही. हे असेच यापुढे चालू राहणार असून आम्हीही आता बोंबा मारून थकलो आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी दिली.

Bayet - मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम,
Conclusion:dombiwali
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.