ETV Bharat / state

नवी मुंबईत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी चित्ररथ

नवी मुंबईत स्वच्छतेसंबंधी जनजागृती व्हावी म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चित्ररथ साकारला आहे.

कचरासूर
कचरासूर
author img

By

Published : Jan 5, 2020, 10:01 AM IST

नवी मुंबई - स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन तिमाहीत नवी मुंबईने देशातून तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मान मिळवला आहे. नवी मुंबईत स्वच्छतेसंबंधी जनजागृती व्हावी म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चित्ररथ साकारला आहे.

नवी मुंबईत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी चित्ररथ

देशात स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये आलेल्या तिसरा क्रमांक टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन जोरदार प्रयत्न करीत आहे. अभियानामधील नवी मुंबईकरांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती सुरू केली असून पालिकेच्या माध्यमातून चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथावर स्वच्छते संबधी जनजागृतीसाठी एलईडीच्या माध्यमातून संगीतमय व्हिडीओ क्लिप्स प्रसारित करण्यात येत आहे. या चित्ररथावर ओला व सुका कचरा तसेच घातक घरगुती कचरा यांच्यासाठी असणारे तीन प्रतिकात्मक डबेही ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक चौकात व गल्ल्यांमध्ये हा रथ फिरवून स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन नवी मुंबईला पहिल्या तिमाहीमध्ये देशातील तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर हे मानाकंन टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.

हेही वाचा - दुचाकीस धक्का लागल्याच्या रागातून ट्रेलरमधील केमिकल पावडर दिली रस्त्यावर फेकून; अज्ञातांचा शोध सुरू

Intro:
स्वच्छता सर्वेक्षण 2020 साठी नवी मुंबई महानगरपालिका सक्रिय...
जनजागृती साठी साकारला कचरासूर....
चित्र रथावर एलडीचाही समावेश...

नवी मुंबई:

देशातील तिसऱ्या क्रमांकांचे स्वच्छ शहर म्हणून स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन तिमाही मध्ये नवी मुंबईने पटकावला आहे. नवी मुंबईतील स्वच्छते संबधी जनजागृती व्हावी म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चित्ररथ साकारला आहे

देशात स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये आलेल्या तिसरा क्रमांक टिकण्यासाठी लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन हिरहिरीने प्रयत्न करीत आहे. अभियाना मधील नवी मुंबईकरांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती सुरू केली असून पालिकेच्या माध्यमातून चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथावर स्वच्छते संबधी जनजागृतीसाठी एल इ डीच्या माध्यमातून संगीतमय व्हिडीओ क्लिप्स प्रसारित करण्यात येत आहे. या चित्ररथावर ओला व सुका कचरा तसेच घातक कचरा यांच्यासाठी असणारे तीन प्रतिकात्मक डबेही ठेवण्यात आले आहेत.चौका चौकात व गल्ल्यात हा रथ फिरवून स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन नवी मुंबईला पहिल्या तिमाही मध्ये देशातील तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर हे मानाकंन टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.